तरुण भारत

महिलेच्या गळय़ातील सोन्याचे गंठण भामटय़ांनी लांबविले

टिळकवाडी येथील घटनेने पुन्हा खळबळ

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

सतत गजबजलेल्या टिळकवाडी परिसरात दुचाकीवरून आलेल्या भामटय़ांनी महिलेच्या गळय़ातील अडीच तोळय़ाचे सोन्याचे गंठण लांबविल्याची घटना नववर्षाच्या पहिल्या दिवशीच घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पुन्हा महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मराठा कॉलनी येथील नेहा संतोष पाटील या पराठा कॉर्नर, टिळकवाडी येथे नातेवाईकांशी वाट पहात कारजवळ थांबल्या होत्या. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या भामटय़ांनी त्यांच्यावर नजर ठेवली होती. नेहा या कारमध्ये बसण्यासाठी वळताच अचानक मोटारसायकलवरून गळय़ातील सोन्याचे गंठण हिसकावून नेले. यामुळे घाबरलेल्या नेहा पाटील यांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत ते भामटे मोटारसायकलवरून पसार झाले होते.

या घटनेमुळे त्या परिसरात गोंधळ उडाला होता. त्यांच्या नातेवाईकांनी तसेच तरुणांनी परिसरात संशयितांची पाहणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच हाती लागले नाही. या घटनेची माहिती टिळकवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी परिसरात फेरफटका मारला. मात्र भामटे हाती लागले नाहीत. या घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात झाली असून जवळपास अडीच लाख रुपये किमतीचे सोने असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांसमोर पुन्हा आव्हान

माळमारुती परिसरातही अशीच घटना घडली होती. 15 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर शुक्रवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी ही घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एखादी सराईत टोळी बेळगाव परिसरात सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांसमोर पुन्हा आव्हान ठाकले असून आता पोलिसांना अशा भामटय़ांना पकडण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

Related Stories

वरुणराजा,आवर रे,सावर रे!

Omkar B

लॉकडाऊन नाहीच ; स्वतःची काळजी स्वतःच घ्या !

Patil_p

व्हॅक्सिन घेण्यासाठी बिम्समध्ये मोठा गोंधळ

Amit Kulkarni

दिलासादायक : लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जनात घट

Abhijeet Shinde

कंत्राटदाराचा गलथान कारभार चव्हाटय़ावर

Patil_p

कर्नाटक सरकारच्या नव्या आदेशावरून वाद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!