तरुण भारत

यमकनमर्डी येथे गोळी झाडणाऱया तरुणाला अटक

प्रतिनिधी/ बेळगाव

यमकनमर्डी येथे मंदिराच्या कट्टय़ावर बसलेल्या एकावर गोळी झाडण्यात आली होती. तोंडाला मास्क आणि मंकीकॅप परिधान करुन हा हल्ला करण्यात आला होता. प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्यानंतर यमकनमर्डी पोलिसांत खळबळ उडाली होती. या घटनेनंतर फरारी आरोपीचा शोध पोलीस करत होता. शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली आहे.

Advertisements

विनायक सोमशेखर व्हरकेरी (वय 26, रा. गणपत गल्ली, यमकनमर्डी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने 16 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास भरमा भोपाल धुपदाळी (रा. हत्तरगी) यांच्यावर गोळी झाडली होती. भरमा यांच्या खांद्याला ती गोळी लागली होती. रात्री घडलेल्या या घटनेनंतर विनायक हा फरार झाला होता.

भरमा यांनी आपल्या नातेत्यातील एका मुलीचा विवाह ठरविण्यास मध्यस्ती केली होती. त्या मुलीवर विनायक याचे प्रेम असल्याचे समजते. यातूनच त्याने हा गोळीबार केला होता. पोलिसांनी विनायक याला अटक करुन त्याच्यावर भा.दं.वि. 307 आणि 25(1/बी) या कलमाव्दारे गुन्हा नोंदविला आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, गोकाक उपविभागाचे डीवायएसपी जावेद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरीचे पोलीस निरीक्षक जी. आय. कल्याणशेट्टी, पीएसआय रमेश पाटील, हवालदार एल. वाय. किलारगी, व्ही. आर. नाईक, एस. ए. शेख, एम. व्ही. न्हावी, आर. एस. हुच्चरेड्डी, एच. बी. करोशी, जी. आय. हुबळी, एस. एन. अरबळी यांनी ही कारवाई केली आहे.

Related Stories

शिक्षक बदली प्रक्रियेला स्थगिती

Amit Kulkarni

भटक्मया कुत्र्यांच्या हल्ल्यात चार मुले जखमी

sachin_m

लॉकडाऊन काळात लोंढा मिरज रेल्वे मार्गावर चार पुलांची पुनर्बांधणी

Patil_p

महाराष्ट्राच्या सागरने संगमेशला दाखविला घिस्सा

Amit Kulkarni

येळ्ळूर ग्रा.पं.पोटनिवडणूक : पाच अर्ज दाखल

Amit Kulkarni

निलजीतील ‘त्या’ तलावाचे काम निकृष्टदर्जाचे

Amit Kulkarni
error: Content is protected !!