तरुण भारत

जखमी वॅग्नरच्या जागी मॅट हेन्रीला संधी

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च

पाकविरुद्ध होणाऱया आगामी दुसऱया कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली. न्यूझीलंड संघामध्ये दुखापतीने जायबंदी झालेला वेगवान गोलंदाज नील वॅग्नरच्या जागी आता मॅट हेन्रीला संधी देण्यात आली आहे.

Advertisements

उभय संघातील ही दुसरी कसोटी येत्या रविवारपासून सुरू होईल. यापूर्वी झालेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटीत खेळाच्या दुसऱया दिवशी फलंदाजी करत असताना पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या यॉर्करवर वॅग्नर जखमी झाला होता. त्याच्या उजव्या पायाच्या दोन बोटांची हाडे मोडली आहेत. या दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी त्याला किमान सहा आठवडय़ांची गरज असल्याचे क्रिकेट न्यूझीलंडने सांगितले. त्याच्या जागी आता वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पाक अ संघाविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंड अ संघाचे प्रतिनिधित्व करताना मॅट हेन्रीने 53 धावांत 6 गडी बाद केल्याने न्यूझीलंडच्या क्रिकेट निवड समिती प्रमुखांनी त्याची दुसऱया कसोटीकरिता निवड केली आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडने पाकवर 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंड संघ- केन विल्यम्सन (कर्णधार), ब्लंडेल, बोल्ट, मॅट हेन्री, जेमिसन, लॅथम, मिचेल, निकोल्स, सँटनर, साऊदी, रॉस टेलर, वॅटलिंग आणि यंग.

Related Stories

दुखापतग्रस्त बुमराह ब्रिस्बेन कसोटीतून बाहेर

Patil_p

टीम इंडिया दौऱयावर न आल्यास निराशा होईल : लाबुशाने

Patil_p

पंजाबमधील नव्या क्रिकेट स्टेडियमला जय शहा यांची भेट

Patil_p

सानिया-शुआई उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

भारताची मालिकाविजयाकडे आगेकूच

Patil_p

भारत-इंग्लंड यांच्यातील चेन्नईतील सामने प्रेक्षकांविना

Patil_p
error: Content is protected !!