तरुण भारत

ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतून त्सोंगाची माघार

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

फ्रान्सचा 35 वषीय पुरुष टेनिसपटू ज्यो विल्प्रेड त्सोंगाने फेब्रुवारी महिन्यात येथे खेळविल्या जाणाऱया नव्या वर्षाच्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. दुखापतीमुळे आपण या स्पर्धेत खेळू शकणार नाही, असे त्सोंगाने स्पर्धा आयोजकांना कळविले आहे.

Advertisements

अलीकडच्या वर्षभराच्या कालावधीत वारंवार दुखापतीमुळे त्सोंगाला टेनिस क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत त्सोंगाने आपला शेवटचा सामना खेळला होता. पाठदुखापतीमुळे त्याने गेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील तिसऱया फेरीच्या सामन्यातून माघार घेतली होती. या दुखापतीतून आपण पूर्ण तंदुरुस्त नसल्याचे त्सोंगाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. अलीकडेच स्वीसचा अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडररने दुखापतीमुळेच ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची घोषणा केली होती. 2008 साली ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत त्सोंगाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. 2021 सालातील ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा 8 फेब्रुवारीपासून सुरू होईल.

Related Stories

जोकोविच-नदालमध्ये अंतिम लढत

Patil_p

विंडीजचा फडशा, ब्रॉडचे 6 बळी

Patil_p

भारताचा लक्ष्य सेन अंतिम फेरीत, पीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात

Patil_p

बांगलादेशचा तमिम इक्बाल कसोटी मालिकेतून बाहेर

Patil_p

सनरायजर्स हैदराबादची प्ले-ऑफमध्ये धडक!

Patil_p

अंशूला रौप्य तर सरिताला कांस्यपदक

Patil_p
error: Content is protected !!