तरुण भारत

उत्तर भारत गारठला

आता गारपिटीचा अंदाज, राजधानीत 1.1 अंश सेल्सिअस

पुणे / प्रतिनिधी

Advertisements

उत्तरेकडे कडाक्याची थंडीची लाट पसरली असून, राजधानी दिल्लीत 2006 नंतर जानेवारी महिन्यातील सर्वात कमी 1.1 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. दरम्यान, पुढील 24 तासांत उत्तरेकडच्या काही भागातील थंडीच्या लाटेची तीव्रता कमी होणार असून, वायव्य, उत्तर तसेच मध्य भारताच्या काही भागात पुढील काही दिवस गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी पसरली आहे. दिल्लीत नवीन वर्षाची सुरुवात दाट धुक्यात तसेच कडाक्याच्या थंडीत झाली, तर उत्तरेत अनेक भागात तापमानाचा पारा मोठय़ा प्रमाणात खाली घसरला आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीच्या भागात शुक्रवारी तीव्र थंडीची लाट नोंदविण्यात आली. पुढील 24 तास यातील काही भागात ही लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर मात्र 3 ते 5 जानेवारीदरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या काही भागात गारपीट होणार आहे. यशिवाय जम्मू, काश्मीरच्या भागात याकाळात जोरदार बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. भारताच्या मैदानी प्रदेशात हरियाणातील हिस्सार येथे शुक्रवारी सर्वात कमी उणे 1.2 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.

राजधानी गारठली

दरम्यान, 2006 नंतर दिल्लीत जानेवारीमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद  झाली आहे. दिल्लीत 1.1 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. 8 जानेवारी 2006 साली 0.2 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले होते. शनिवारपासून राजधानीत दिल्लीत थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

Related Stories

राम मंदिरासाठी 40 किलो चांदीची शिळा; मोदींच्या हस्ते होणार अर्पण

datta jadhav

यूपी : 7 जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी ‘स्पेशल लसीकरण बूथ’

Rohan_P

बिहार : सिवानचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचे निधन

Rohan_P

माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार सुजान सिंह पठानिया यांचे निधन

Rohan_P

योगी आदित्यनाथांकडून गंगायात्रेचा शुभारंभ

Patil_p

दहशतवाद्यांकडून होतोय चिनी पिस्तुलांचा वापर

Patil_p
error: Content is protected !!