तरुण भारत

तातडीच्या वापरासाठी कोविशिल्डला परवानगी

नववर्षारंभी केंद्र सरकारचा निर्णय : ‘सीरम’च्या निर्मितीला मोठे यश : आता लसीकरण मोहिमेला गती येणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ‘तज्ञ समिती’ने कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी यासंबंधीचा निर्णय जाहीर करण्यात आला. भारतात सीरम इन्स्टिटय़ूटने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राजेनेका या वैद्यकीय कंपनीच्या सहकार्याने ‘कोविशिल्ड’ या लसीची निर्मिती केली आहे. या लसीला मान्यता मिळाल्याने आता पुढील आठवडाभरात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्मयता आहे. पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्मयता आहे.

कोरोनाविरोधी लसीला मंजुरी देण्यासाठी सरकारसह वैद्यकीय पातळीवर गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. बुधवारी यासंबंधी महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, त्यात अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता. मात्र, शुक्रवारी नववर्षारंभी दिल्लीत झालेल्या तज्ञ समितीच्या मॅरेथॉन बैठकीत तातडीच्या (इमर्जन्सी) वापरासाठी ‘सीरम’निर्मित कोविशिल्ड या लसीला परवानगी देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड आणि अ?Ÿस्ट्राजेनेका यांचे संयुक्त उत्पादन असलेल्या लसीला ब्रिटन सरकारने अनुमती दिली होती. त्यानंतर भारत या लसीच्या वापरास अनुमती देणारा ब्रिटननंतरचा पहिला देश ठरला आहे.

कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱया सीरम इन्स्टिटय़ूट या कंपनीने कोविशिल्ड लसीसंदर्भात सरकारला अधिक परिपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली होती. ‘सीरम’ने महिन्याभरापूर्वी केंद्र सरकारकडे लस वापरासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर कंपनीकडे लसीसंबंधी आणखी माहिती मागविण्यात आली होती. सर्व माहितीची खातरजमा केल्यानंतर सरकारने नियुक्त केलेल्या तज्ञ समितीने या लसीच्या वापरासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. लसीला आता तातडीने अनुमती मिळाल्यामुळे कोविशिल्ड ही भारताची पहिली लस ठरणार आहे. कारण भारतात अद्याप कोणत्याही लसीच्या वापरासाठी मंजुरी मिळालेली नाही. भारत बायोटेकसह अन्य दोन कंपन्यांच्या लस सध्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

पहिली लस कोणाला?

ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा प्रकार आढळून आल्यानंतर तेथील सरकारने ऑक्सफर्डच्या लसीला आपत्कालीन मान्यता दिली आहे. ब्रिटनप्रमाणेच आता भारतातही लसीकरण मोहीम सुरू होईल. यापूर्वी लसीकरणास परवानगी देताना अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लस टोचून घेतली. मात्र, भारतात राष्ट्रपती रामनाथ कोविंद अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीचा पहिला डोस देण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुप्तता पाळण्यात येत आहे. लसीला मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्यांदा लस कोणाला टोचावी यावर विचार करता येईल असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले असले तरी याबाबत पूर्णपणे गोपनीयता पाळण्यात आली आहे.

आज देशभर लसीकरणाची रंगीत तालीम

कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) देशभर 2 जानेवारी रोजी होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेसाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्हय़ांची निवड करण्यात आली आहे. याच पद्धतीने प्रत्येक राज्यातील चार ते पाच जिल्हय़ांची निवड सराव चाचणीसाठी करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गंत कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्षात लस टोचली जाणार नाही. मात्र प्रत्यक्ष लसीकरणासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून वैद्यकीय यंत्रणेची कार्यक्षमता तपासली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शुक्रवारी दिल्लीत होणाऱया ड्राय रनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱयांसमवेत बैठक घेतली.

अशी असेल ‘ड्राय रन’….

‘ड्राय रन’साठी एकाच जिह्यातील तीन साईट (आरोग्य केंद्रे) निवडण्यात आली आहेत. लसीकरणाच्या या रंगीत तालीममध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणच्या प्रत्येकी 25 जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबतच प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील. तज्ञ वैद्याधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱयांच्या उपस्थितीत ही मोहीम पार पडेल. यापूर्वी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आसाम, आंध्रप्रदेश, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाची ड्राय रन यशस्वीरित्या पार पडली. 28 आणि 29 डिसेंबरला या चार राज्यात ड्राय रन घेण्यात आली.

Related Stories

केरळमध्ये रेस्टॉरंटला परवानगी, वाहनांसाठी ऑड-इव्हन फॉर्म्युला

prashant_c

उत्तराखंडातील हरिद्वारमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आसाममध्ये दारूही स्वस्त

Patil_p

कृषी कायदे २६ नोव्हेंबरपर्यंत मागे घ्या, अन्यथा…; राकेश टिकैत

Abhijeet Shinde

आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात मास्कचे उत्पादन

Patil_p

दिल्लीत दिवसभरात 1404 नवे कोरोना रुग्ण; 16 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!