तरुण भारत

वीज ‘ओटीएस’ योजनेस 31 जानेवारीपर्यंत वाढ

प्रतिनिधी/ पणजी

वीज खात्याची एक रकमी, एक वेळ वीजबिल फेड योजनेची (ओटीएस) मुदत एक महिन्याने म्हणजे 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली आहे. वीज खात्याने या योजनेंर्गत सुमारे रु. 113 कोटी म्हणजे 25 टक्के रक्कम बिलापोटी वसूल केल्याचे ते म्हणाले.

Advertisements

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2020 मध्ये ती योजना सुरू केली होती, तो पूर्ण महिना त्यासाठी देण्यात आला होता. शिवाय त्या योजनेत मुदतवाढ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते, परंतु डिसेंबर महिन्यात योजनेस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने वीज खात्याला योजनेची मुदत एक महिन्याने वाढवण्याची पाळी आली आहे.

मोठमोठय़ा रकमेची वीजबिले थकली असून ती भरली जात नसल्याने सरकारचा आणि पर्यायाने वीज खात्याचा महसूल बुडत आहे. तो बुडू नये आणि वीजबिलांची तरी वसूली व्हावी म्हणून ही योजना आणली. त्यावरील व्याज किंवा दंडाची रक्कमही माफ करण्यात आली असून निदान मूळ रकमेचे बिल तरी फेडले जावे या इराद्याने योजना साकारण्यात आली. पण तिचा पुरेपूर उपयोग अद्याप तरी झालेला दिसत नाही.

वीज जोडणी तोडण्याचा इशारा दिल्यामुळे काही थकबाकीदारांनी वीजबिले फेडली, परंतु अजून अनेकांनी बिले भरलेली नाहीत. त्यांच्यासाठी एक संधी म्हणून पुन्हा एकदा योजनेस मुदतवाढ देण्यात आल्याचे काब्राल यांनी सांगितले.

मोठय़ा थकबाकीदारांची यादी जाहीर करणार : वीजमंत्री

मोठय़ा रकमेच्या थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी वेबसाईटवर टाकण्यात येऊन जाहीर केली जाणार आहे. या मुदतीत जर त्यांनी वीज बिलांची रक्कम फेडली नाही तर त्यांची वीज जोडणी तोडण्यात येणार असल्याचा इशारा काब्राल यांनी दिला आहे. वीज बिलापोटी कोटय़वधींचा महसूल प्रलंबित असून अनेक ग्राहक वर्षानुवर्षे बिलेच भरत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

Related Stories

पराष्टेतील शेतीत शिरले तेरेखोल खाडीचे पाणी

Patil_p

न्यायालयाच्या दडपणामुळेच हेडलॅण्ड सडय़ावरील नाफ्ता खाली करण्यात यश

Patil_p

पणजी – फोंडा महामार्गावर ओल्ड गोव्यात खड्डय़ांचे साम्राज्य

Patil_p

गोवा ही सुवर्णभूमी बनविण्यासाठी सरकार कार्यरत- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Patil_p

161 कोरोनाबाधित, 128 कोरोनामुक्त

Patil_p

प्रसाद गावकर यांचा आमदारकीचा राजीनामा

Amit Kulkarni
error: Content is protected !!