तरुण भारत

मिरकरवाडा बंदरातच नौका दुरूस्तीसाठी जागा देण्याचे आदेश

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मिरकरवाडा बंदराचे दुसऱया टप्पा क्रमांक -2 चे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. ते काम सुरू होईपर्यंत पुर्वापार अनेक वर्षांपासून मच्छीमार नौका दुरुस्ती करण्यासाठी वापरत आहेत. ही असलेली जागा राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर्र मुर्तुझा यांच्या पुढाकाराने शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून मच्छीमारांना नौकेच्या दुरुस्तीसाठी वापरण्यास देण्याचे गृहमंत्र्यांचे संबंधीतांना आदेश दिले आहेत.

Advertisements

   मिरकरवाडा, रत्नागिरी हे महाराष्ट्रातील नंबर 1 चे मासेमारीचे मोठे बंदर आहे ज्याठिकाणी सगळ्यात जास्त मच्छिमार नौका मासेमारी करतात आणि बंदरामध्ये येतात. मिरकरवाडा बंदरामुळे अनेक मत्स्य प्रक्रीयेचे कारखाने, बर्फ कारखाने, छोटे रिक्षा टेम्पो, अनेक लेबरची कामे करणारे कामगार इ. तसेच महिला मच्छिमार जे मिरकरवाडा बंदरावर मासे खरेदी करुन बाजारात, आठवडा बाजारामध्ये विकण्याचे काम करतात असे अनेक प्रकारचे लोक ह्याच्यावर रोजगार मिळवतात असे मा. बशीर मुर्तुझा यांनी सांगितले. मिरकरवाडा बंदरातील मच्छिमार नौका दर 4-5 महिन्यातुन एकदा चोपडान म्हणजे नौकेची डागडुजी करण्यासाठी पुर्वापार अनेक वर्षांपासुन मच्छिमार आपल्या नौका दुरुस्ती करण्यासाठी वापरतात.

          मिरकरवाडा बंदर हे अनेक वर्षे गाळामध्ये रुतले होते परंतु शरदचंद्र पवार ज्यावेळी कृषीमंत्री होत.s त्यावेळेला बशीर मुर्तुझा यांनी त्याची भेट घेऊन त्यांना ही परिस्थिती समजाऊन सांगितली. पवार यांनी बंदराचे दुस-या टप्याचे काम मंजुर केले. आणि 77 कोटी रुपये केंद्र सरकारकडून ह्या बंदराच्या दुस-या टप्प्याचे काम करण्यासाठी दिले. त्यामधुन मिरकरवाडा बंदराचे काम झाले. मिरकरवाडा बंदराचे  77 कोटी रुपयामधुन 70 टक्केच काम झाले आहे. अजुन 30 टक्के काम शिल्लक आहे हे नंतरच्या काळामध्ये बदललेल्या सरकारचे चुकीचे व्यवस्थापन झालेले असल्यामुळे उर्वरीत काम शिल्लक आहे. बंदराच्या दुस-या टप्प्यामध्ये बर्फाचे कारखाने, डीझेल पंप, शौचालये, ऑक्शन हॉल होणार आहेत तसेच सप्लायरच्या कार्यालयासाठी जागा होणार आहे. तसेच काही सप्लायर येऊन राहतील त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था होणार असल्याचे बशीर मुर्तुझा यांनी सांगितले.

   मिरकरवाडा बंदराच्या दुस-या टप्प्यामध्ये मच्छीमारांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तो म्हणजे रॅम्प कारण सर्व मच्छिमार नौकांची सुमारे 4-5 महीन्यातुन एकदा चोपडान म्हणजे डागडुजी करावी लागत.s म्हणजे ती नौका पुन्हा किना-यावर ओढावी लागते. खा-यापाण्यामुळे नौकेवर बसलेला थर घासुन त्यावर पुन्हा पेंट करावे लागते आणि नौका कुठे लिकेज असेल तर ती बुजवावी लागतात. कारण खोल मासेमारी करणा-या नौकांची जर अशाप्रकारे डागडूजी केली नाही तर ह्या नौका समुद्रामध्ये जाऊन बुडू शकतात आणि त्यावर सुमारे 30 ते 35 खलाशी असतात त्यांचा जिव धोक्यामध्ये येऊ शकतो म्हणून मच्छिमार नौकांसाठी दुस-या टप्प्याच्या कामात रॅम्प सुध्दा ठेवण्यात आलेला आहे. बंदराच्या दुस-या टप्प्यामधील जे 30ज्ञ् काम शिल्लक आहे त्यामध्ये रॅम्पचे काम अजुन झालेले नसल्याचे बशीर मुर्तुझा यांनी सांगितले.

   मच्छिमार नौकांची डागडूजी करण्यासाठी जर जागा दिली नाही तर त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल. मत्स्यव्यवसाय ठप्प झाला तर संपुर्ण रत्नागिरीतील जिह्याची आर्थिक नाडी बंद होऊन जाईल. त्यामुळे लोकांचा रोजगारसुध्दा जाईल. रत्नागिरीतील सर्व मच्छिमारांनी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा यांच्यामाध्यमातून शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पवार यांनी गृहमंत्री यांची भेट घालुन दिली. गृहमंत्र्यांना मच्छिमारांनी हकीकत सांगितल्यावर मच्छिमारांची समस्या जाणून घेतली आणि गृहमंत्र्यांनी त्याप्रमाणे संबंधितांना आदेश देऊन त्याठिकाणी मज्जाव करु नका आणि तुमचे देखील काम चालू ठेवा आणि त्यांचे देखील काम चालु द्या जोपर्यंत त्यांचा रॅम्प होत नाही तोपर्यंत त्यांना सहकार्य करा अशाप्रकारचे गृहमंत्र्यांनी संबंधितांना आदेश दिले असल्याचे बशीर मुर्तुझा यांनी सांगितले.

Related Stories

मंडणगड तालुकावासीय जपताहेत माणुसकी!

Patil_p

चिपळुणात दोन दिवसांत हजारें चाकरमानी दाखल

Patil_p

आरटीओ कार्यालय एजंट्सच्या हवाली?

Patil_p

रत्नागिरीत २५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

खेडमध्ये 2290 ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो!

Patil_p

लोटे कंपनीतील स्फोटात तीन कामगार ठार

Patil_p
error: Content is protected !!