तरुण भारत

सातारा : फुले दाम्पत्याचे कार्य ऊर्जा, प्रेरणा देणारे

सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणार आहे. सावित्रीबाई यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हा महिला शिक्षण दिन संपूर्ण भारतात साजरा व्हावा, यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे अन्न अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.   

सुरुवातीला नायगाव ता. खंडाळा येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास भुजबळ यांनी अभिवादन करुन पुरातत्व विभागाने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित उभारलेल्या स्मारक व चित्रशिल्पाची पहाणी केली. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, माजी खासदार समीर भुजबळ, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनीही सावित्रीबाई फुले  यांच्या स्मारकास अभिवादन केले.

Advertisements

फुले दांपत्यानी समाज परिवर्तनाचे मोठे काम केले आहे. यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर काम करीत आहे. सावित्रीबाई अखेरच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम करीत राहिल्या. त्यांच्या कार्याचाही गौरव ब्रिटीश सरकारने केला. महाराष्ट्र शासन सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात महिला शिक्षण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन फुले दांपत्यांनी केलेल्या कार्याचीही माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. 

Related Stories

औंध संगीत महोत्सव 80 वर्षांत पहिल्यांदाच ऑनलाईन

Abhijeet Shinde

जिल्ह्यात लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज

Abhijeet Shinde

नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी

datta jadhav

सेंद्रिय शेतीतून प्रगती साधा :डॉ. नितीन मोरे

Patil_p

आरोग्य विभागाचा कारभार काही केल्या सुधारेनाच

Patil_p

लसीसाठी रात्रभर जागरण

Patil_p
error: Content is protected !!