तरुण भारत

रविवारी हजाराहून अधिक अहवाल निगेटिव्ह

29 जण झाले कोरोनामुक्त, 22 नवे रुग्ण

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

रविवारी जिल्हय़ातील 1 हजार 041 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 29 जण कोरोनामुक्त झाले असून वेगवेगळय़ा इस्पितळांतून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 22 नवे रुग्ण आढळले आहेत.

जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप 11 हजार 677 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. रविवारी तुरमुरी, मुतगा, बिम्स हॉस्टेल, शिवाजीनगर, टिळकवाडी, सदाशिवनगर, विनायकनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून बेळगाव तालुक्मयातील सात जणांचा यात समावेश आहे.

जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 311 इतकी झाली आहे. तर 25 हजार 773 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 187 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत आरोग्य विभागाने 4 लाखांहून अधिक जणांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. अद्याप 48 हजार 336 जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.

Related Stories

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या नावाखाली होणारे गैरप्रकार टाळा

tarunbharat

रविवारपेठेतील व्यापाऱयांना दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

Patil_p

परिवहन कर्मचाऱयांच्या संपाचा तिढा अद्याप कायम

Amit Kulkarni

खानापूर पोलिसांकडून चोरटी दारू विकणाऱयाला

Patil_p

कर्नाटकात आलेल्या 57 विदेशी तबलिगींची नावे काळय़ायादीत?

Patil_p

मनपाचे कोटय़वधीचे नुकसान

Patil_p
error: Content is protected !!