तरुण भारत

जैन इलेव्हन, जैन स्पार्टन्स, जैन सुपरकिंग संघांची विजयी सलामी

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

जैन स्पोर्ट्स अकादमी आयोजित जैन समाज मर्यादीत एमएसडी चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जैन इलेव्हन, जैन स्पार्टन्स, जैन सुपरकिंग संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजयी सलामी दिली.

Advertisements

युनियन जिमखाना मैदानावर जैन समाज मर्यादित एमएसडी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जैन समाजाचे चेअरमन कांतीलालजी पोरवाल, चंपालालजी पोरवाल, बाबुलालजी शहा, राजू खोडा व संघटनेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करण्यात आल्यानंतर त्यांना सर्व संघांची ओळख करून देण्यात आली. सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात जैन इलेव्हन संघाने जैन शूटर संघाचा 28 धावानी पराभव केला. दुसऱया सामन्यात जैन स्पार्टन्स संघाने जैन चॅम्पियन संघाचा 7 गडय़ानी पराभव केला. तिसऱया सामन्यात जैन सुपरकिंग संघाने जैन फ्रेंन्ड्स संघाचा 8 गडय़ानी पराभव केला. चौथ्या सामन्यात जैन इलेव्हनने जैन मिरविकीस संघाचा 20 धावांनी पराभव केला. सोमवारी पुढील 5 साखळी सामने खेळविण्यात येणार असून, मंगळवारी उपांत्य फेरीचे दोन सामने व अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.

Related Stories

घटस्फोटीत पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱया युवकाला कोरोना

Patil_p

कराटेपटू प्रिया जोमचा गौरव

Amit Kulkarni

रात्रभर भजन करून नववर्षाचे स्वागत

Patil_p

मुतगा येथे लक्ष्मी मंदिरात चोरी ; दागिने लंपास

Omkar B

डेंग्यू प्रतिबंधक औषधाचे आनंदवाडी येथे वितरण

Amit Kulkarni

‘पिशवी’ चा ‘प्रयास’ पर्यावरणासाठी

Amit Kulkarni
error: Content is protected !!