तरुण भारत

कॅलिफोर्निया : स्थिती बिकट

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता यापूर्वीच जाणवू लागली होती. परंतु आता तेथे गंभीर रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. याचमुळे लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कॅलिफोर्निया प्रांत कोविड-19च्या वाढत्या संक्रमणाला तोंड देत आहे. हा अत्यंत अवघड काळ आहे. आमच्या रक्तपेढींना दात्यांची अत्यंत गरज आहे. कृपया प्रत्येक रक्तगटाच्या लोकांनी पुढाकार घ्यावा. या महामारीला सामोरे जाण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. आमच्या लोकांचा जीव वाचवावा लागणार असल्याचे प्रांताच्या आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.  कॅलिफोर्नियात दिवसभरात 585 बाधितांचा मृत्यू झाला आहे. एक दिवसातील बळींचा हा सर्वाधिक आकडा ठरला आहे. स्थिती अत्यंत बिघडल्याने आरोग्य कर्मचाऱयांसह नॅशनल गार्ड, अमेरिकन सैन्याचे आरोग्य पथकही तैनात करण्यात आले आहे. रुग्णांना अन्यत्र हलविण्यासाठी वायुदलाची मदत घेतली जात आहे.

Related Stories

दाट लोकवस्तीत धोका

Patil_p

‘नरेंद्र मोदी महान नेते!’ : डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा अचानक बदलली

prashant_c

लोकांवर हल्ले करत आहेत कावळे

Patil_p

विमानतळावर चाचणी केंद्र

Patil_p

अंटार्क्टिकात तुटला विशाल हिमखंड

Patil_p

कोटय़वधींचे हॉटेल निर्माण करताना मोठी चूक

Patil_p
error: Content is protected !!