तरुण भारत

उइगूर मुस्लिमांना झिडकारणार तुर्कस्तान

लसीच्या बदल्यात चीनसोबत प्रत्यार्पण करार : तुर्कस्तानच्या अध्यक्षांसाठी इकडे आड, तिकडे विहीर : पैशांकरता मौन

वृत्तसंस्था / अंकारा

तुर्कस्तानात सद्यकाळात चीनपायी प्रचंड दबावात आहे. शिनजियांग प्रांतात दहशतवाद फैलावून अनेक उइगूर मुस्लीम तुर्कस्तानात लपल्याचा चीनला संशय आहे. चीन आता या कथित दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी तुर्कस्तानवर दबाव टाकत आहे. तुर्कस्तानने याला नकार दिल्यास चीन स्वतःची कोरोनावरील लस सोपविण्यास नकार देणार असल्याची चर्चा आहे.

चीनच्या सिनोवॅक कंपनीची लस प्राप्त करण्यासाठी तुर्कस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु 2017 च्या एका कराराला मान्यता देण्यासाठी चीनने तुर्कस्तानवर टांगती तलवार ठेवली आहे. या कराराच्या अंतर्गत निर्वासित उइगूर मुस्लिमांचे प्रत्यार्पण चीनला करावे लागेल. हे उइगूर दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा चीनचा आरोप आहे. तीन वर्षांपूर्वी या प्रत्यार्पण करारावर चर्चा झाली होती.

चीनच्या शिनजियांग प्रांतात 10 लाखांहून अधिक उइगूर मुस्लिमांना कथित पुनर्शिक्षण शिबिरांमध्ये डांबण्यात आले आहे. या शिबिरांमधील स्थिती अत्यंत खराब आहे. तेथे मुस्लिमांवर अत्याचार होत आहे. धर्माचा त्याग करत चिनी संस्कृती पूर्णपणे अवलंबिण्यासाठी त्यांच्यावर बळजबरी केली जात आहे. कुठल्याही स्थितीत निर्वासित उइगूरांना चीनच्या हवाली केले जाऊ नये असे मानवाधिकार संघटनांनी तुर्कस्तानला बजावले आहे. अशा स्थितीत मुस्लिमांचे नेतृत्व करू पाहणारे तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान केंडीत सापडले आहेत.

उइगूरांप्रकरणी सोयीस्कर मौन

काश्मीर प्रश्नी पाकिस्तानची तळी उचलणारा तुर्कस्तान उइगूर मुस्लिमांवरील अत्याचाराप्रकरणी सोयीस्कर मौन बाळगून आहे. 2019 मध्ये नाटोच्या सदस्य देशांनी चीनमधील उइगुर मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पत्रक काढले होते, परंतु तुर्कस्तानने यात भाग घेतला नव्हता. तुर्कस्तानातील विरोधी पक्षाने उइगूर मुस्लिमांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला असता एर्दोगान यांनी तो दडपला होता. तुर्कस्तानने मौन राखण्यासाठी 50 अब्ज डॉलर्सची रक्कम घेतल्याचा आरोपही झाला आहे.

उइगूर तुर्क वंशाचेच

उइगूर मुस्लिम हे मूळचे तुर्क वंशीय आहेत. 14 व्या शतकात उइगूर मुस्लिमांना चीनच्या हुनान प्रांतातील एक बंड मोडून काढण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. ज्यानंतर उइगूर सैनिक तेथेच स्थायिक झाले होते. या समुदायाची भाषा तुर्की भाषेतील बोलीभाषा आहे.

तुर्कस्तानच्या अध्यक्षांची टोलवाटोलवी

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने मोठी रक्कम देऊन तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान यांचे मौन विकत घेतल्याचा आरोप उइगूर अमेरिकन असोसिएशनच्या माजी अध्यक्षांनी केला आहे. चीन आणि तुर्कस्तान यांच्यात कोरोना लसीसंबंधी मोठा करार झाला आहे. परंतु लसीची पहिली खेप चीनमधून तुर्कस्तानात पोहोचविण्यास विलंब होत आहे. हा विलंब जाणूनबुजून केला जात असल्याचे मानले जात आहे. तुर्कस्तान सरकारवर उइगूरांना सोपविण्यासाठी दबावर आणण्याचा चीनचा प्रयत्न आहे. लसीचा पुरवठा रोखून चीन तुर्कस्तानकडून ईप्सित साध्य करू पाह आहे. 

Related Stories

पुलवामा हल्ल्याची पाक मंत्र्याकडून कबुली

datta jadhav

संशयित दहशतवाद्याच्या नागरिकत्वावरून वाद

Patil_p

‘लॉकडाउन’ 2020 मधील शब्द

Omkar B

मॉडर्नाची लस, आशेचा नवा किरण

Patil_p

तुर्कस्तानात संकट वाढले

Patil_p

कोरोना काळात वाढले मना रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!