तरुण भारत

दख्खनचा राजा ज्योतिबातून उलगडणार उन्मेष अश्वाची कथा

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. ज्योतिबाच्या अवताराची गोष्ट या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. लवकरच मालिकेत ज्योतिबाच्या उन्मेष अश्वाची गोष्टही पाहायला मिळणार आहे. पांढऱया शुभ्र घोडय़ावर स्वार असणाऱया ज्योतिबाच्या कथा आपण वाचल्या आहेत. पण हा घोडा सफेद रंगाचा का? ज्योतिबाला हा घोडा कुणी भेट दिला? यामागची कथा दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेतून उलगडणार आहे.

ज्योतिबाची भूमिका साकारणाऱया विशाल निकमने या मालिकेसाठी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतलं आहे. मालिकेतला हा खास प्रसंग साकारण्यासाठी सेटवर कोहिनूर नावाच्या घोडय़ाची खास एण्ट्री झाली आहे. नावाप्रमाणेच हा घोडा कोहिनूर असल्याचं विशालने सांगितलं. या खास दोस्तासोबत माझी मैत्री झाली आहे. माझ्याकडून घोडेस्वारी करताना थोडी जरी चूक झाली तरी कोहिनूर मला सांभाळून घेतो. मी सेटवर आल्यावर पहिली कोणाची भेट घेत असेन तर तो आहे कोहिनूर. त्याला खाऊ घालणं, त्याच्याशी गप्पा मारणं ही माझी सर्वात आवडती गोष्ट आहे. ज्योतिबाची भूमिका साकारण्यासाठी कोहिनूरचाही खूप मोलाचा वाटा आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेतून ज्योतिबाला उन्मेष अश्व कसा मिळाला याची गोष्ट पाहायला मिळणार आहे. ही मालिका स्टार प्रवाहवर रोज संध्याकाळी 6.30 वाजता प्रसारित होते.

Advertisements

Related Stories

बॉलिवूडमध्ये अनन्याला 2 वर्षे पूर्ण

Patil_p

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला

triratna

‘डायनामाइट’च्या पेहरावाचा 1.18 कोटीत लिलाव

Patil_p

श्रेयाचं गॉगल कलेक्शन झक्कास

Patil_p

दक्षिणेतील ‘एक्स्प्रेशन क्वीन’ बॉलिवूडमध्ये येणार

Patil_p

सागर घेतोय ऑनलाईन गिटारचे धडे

Patil_p
error: Content is protected !!