तरुण भारत

मडगावच्या मध्यवर्ती भागाला कचऱयामुळे बकाल स्वरूप

सडेकर लेन, सालसेत फार्मसीजवळ पॅसेजमध्ये कचरा टाकणे चालूच

प्रतिनिधी/ मडगाव

Advertisements

मडगाव पालिकेकडून घरोघरी कचरा उचल मोहीम सुरळीतपणे राबविली जात असली, तरी शहराच्या मध्यवर्ती भागात सडेकर लेन, सालसेत फार्मसीजवळ यासारख्या पॅसेजमध्ये कचरा आणून टाकण्याचे प्रकार चालूच असल्याचे दिसून येत आहे. सदर कचरा हटविण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून यातील सुक्मया कचऱयाचे ढीग सडेकर लेनमधील पॅसेजजवळील पदपथावर जमा करून ठेवल्याने या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.

सालसेत फार्मसी व सडेकर लेन पॅसेज यांचा लोक न्यू मार्केट व सभोवतालील परिसरात जाण्यासाठी वापर करत असतात. मात्र या दोन्ही पॅसेजमध्ये न्यू मार्केट व जवळचे दुकानदार तसेच अन्य भागांतील लोक दुचाकी व अन्य वाहनांतून येऊन कचरा टाकत असल्याने येथील पॅसेज भरून लोकांना येथून ये-जा करणे शक्मय होत नसते. सकाळच्या वेळी अशी स्थिती जास्त प्रमाणात सडेकर लेन पॅसेजमध्ये आढळून येते.

सदर ठिकाणी गोळा होणारा कचरा दैनंदिन उचलला जात असला, तरी सुक्या कचऱयाची उचल वेळेत होताना दिसून येत नाही. कामगार सदर सुका कचरा पिशव्यांत भरून वा तसाच जवळच्या पदपथावर टाकून देत असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागाला बकाल स्वरूप आल्याचे दिसून येते. पदपथावर कचरा टाकल्याने पादचाऱयांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या कैफियती आहेत.

कचऱयाच्या दुर्गंधीने दुकानदार, लोक हैराण

कचऱयाची दुर्गंधी सुटत असल्याने जवळचे दुकानदार तसेच या परिसरातून जाणाऱया लोकांना नाकावर हात ठेवावा लागतो. पालिकेने या ठिकाणी जमलेला सुका व ओला कचरा वेगळा करण्यासाठी दोन कामगार नियुक्त केले असले, तरी कामचुकारपणा होत असल्याने पॅसेज लवकर मोकळय़ा होताना दिसत नाहीत. त्यामुळे लोकांना वळसा घालून मार्ग बदलून जावे लागत असल्याच्या व्यापाऱयांच्या तक्रारी आहेत.

वरिष्ठांना कल्पना दिली : पर्यवेक्षक

यासंदर्भात या भागाचे पर्यवेक्षक रोमियो यांच्याशी विचारणा केली असता सुका कचरा पदपथावर पडून राहत असल्याची जाणीव आपणास असून यासंदर्भात आपण पालिका अभियंता व सेनिटरी निरीक्षकांना कल्पना दिली असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. सदर कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे वरील वरि÷ांचे काम आहे. अजूनही जागा सांगितली जात नसल्याने कचरा पडून राहण्याचे प्रकार वाढले आहेत, असे त्यांनी सांगितले.

सेनिटरी निरीक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी

मडगाव पालिकेकडे विराज आरबेकर व संजू सांगेलकर असे दोन सेनिटरी निरीक्षक असून पालिका क्षेत्र कचरामुक्त राहील हे पाहण्याची त्यांची जबाबदारी आहे. मात्र त्यांच्याकडून अशा प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पर्यवेक्षकांकडे काम सोपविले जाते, फेरफटका मारून त्यांच्याकडून फिल्ड वर्क होत असल्याचे दिसून येत नाही. रात्रीच्या वेळी पालिका क्षेत्रात पंचायत क्षेत्रांतील व हॉटेलांतील कचरा आणून टाकण्याचे प्रकार चालूच असून यावर कारवाई करण्यात व उपाययोजना राबविण्यात सेनिटरी विभाग कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी या सेनिटरी निरीक्षकांवर नजर ठेवून  त्यांच्याकडून कामे करून घेण्याची गरज एका माजी नगरसेवकाने बोलून दाखविली. रात्रीच्या वेळी कचरा फेकणाऱयांविरुद्ध कारवाई मोहीम राबविण्याची जबाबदारी या सेनिटरी निरीक्षकांकडे द्यावी, अशी सूचना त्यांनी केली.

Related Stories

गोवा डेअरीला सावरण्यात त्रिसदस्यीय समिती अपयशी

Amit Kulkarni

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा श्री दामोदर मंदिरात सन्मान

Amit Kulkarni

वळपे येथे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक- कॉलिस वाहनाची समोरासमोर धडक

Amit Kulkarni

कोविडच्या दुसऱया लाटेत ईएसआय हॉस्पिटलात 1500 जणांवर उपचार

Amit Kulkarni

मोफत पाणी, वीज दरवाढ न करण्याची घोषणा ही ‘स्टंटबाजी’

Omkar B

प्रो. फुटबॉलमध्ये पिछाडीवरून वास्कोची एफसी गोवावर मात

Amit Kulkarni
error: Content is protected !!