तरुण भारत

अंजुणे धरणाच्या उपकालव्यांची दुरुस्ती सुरू

वाळपई प्रतिनिधी

 सत्तरी तालुक्मयातील केरी पंचायत  क्षेत्रांमध्ये अंजुणे धरणाच्या जलाशयाच्या प्रवाहासाठी वापरण्यात येणाऱया कालव्याची दुरुस्ती आता सुरू झाली आहे. यासंदर्भात वृत्त पसरल्यानंतर लवकरच या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली असून त्याच्या मधून पाण्याचा प्रवाह सुरू करण्यात आलेला आहे. यामुळे नागरिकांनी व खास करून शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र शिरोली या ठिकाणी कार्यरत असलेल्या एका पाणीवाटप संस्थेच्या कारभारामध्ये गैरव्यवहार निर्माण झाल्यानंतर सदरचे काम आता सरकारच्या पातळीवर करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित खात्याच्या सूत्रांकडून उपलब्ध झालेली आहे.

Advertisements

यासंदर्भाची माहिती अशी की अंजूणे धरणाच्या जलाशयाच्या पाण्याचा वापर केरी पंचायत क्षेत्र व शेजारील असलेल्या पंचायतीच्या काही गावांमध्ये कृषी विकासासाठी वापरण्यात येत असतो. यामुळे आतापर्यंत हजारो चौरस मीटर जमीन ओलिताखाली आलेली आहे .वेगवेगळय़ा प्रकारच्या लागवड करून यापाण्याचा वापर शेती विकासासाठी करण्यात येत असल्याचे आतापर्यंत आढळून आलेले आहे. पाण्याचा पुरवठा व वाटप पारदर्शक प्रमाणात व्हावा यासाठी पाणी वाटप संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. सरकारने या संस्था?ना मान्यता दिलेली आहे .गेल्या काही वर्षापासून पाणीवाटप संस्था?च्या माध्यमातून पाण्याचा व्यवस्थितपणे वापर होताना दिसत आहे .यासाठी सरकार पातळीवरून या पाणीवाटप संस्था?ना निधी उपलब्ध करण्यात येत असतो.

संस्थाना निधी उपलब्ध

   यापाणी वाटप संस्था?च्या माध्यमातून सरकारकडून उपलब्ध होत असलेल्या निधीचा वापर करून कालव्याची दुरुस्ती व आवश्यक स्वरुपाची दुरुस्ती यानिधीच्या माध्यमातून करण्यात येत असते. पावसाळा संपल्यानंतर या कालव्याची दुरुस्ती ताबडतोब हाती घेण्यात येत असते .यंदा मात्र या दुरुस्तीला उशीर झाला व त्याचा विपरीत परिणाम पाणी पुरवठय़ावर झाल्याचे शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे. यासंदर्भात वृत्त गेल्या चार दिवसापूर्वी प्रसारित करण्यात आले होते .त्याची दखल घेऊन ताबडतोब कालव्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आलेली आहे .सध्यातरी एक वगळता इतर पाणी वाटप संस्था?च्या माध्यमातून दुरुस्तीला प्रारंभ करण्यात आलेले आहे. जवळपास सर्वच पाणीवाटप संस्था?च्या माध्यमातून कालव्यांची दुरुस्ती पूर्ण झालेली आहे. अंजुणे धरणाच्या जलाशयातून पाण्याचा प्रवाह शेतीसाठी उपलब्ध करण्यात आलेला असून सर्वांना समाधानकारक पाणीपुरवठा होत असल्याचे अधिकारी वर्गाचे म्हणणे आहे.

 यासंदर्भात संबंधित खात्याचे अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पाणी वाटप संस्था?ना समाधानकारक पाणी वाटप करण्यात येत असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला नाही. गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येणारी प्रक्रिया त्याच पद्धतीने पाण्याच्या विनियोग करण्यात येत असल्याचे सदर अधिकाऱयाने संबंधित प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

Related Stories

आंबावलीतही कोरोनाचा रुग्ण

Omkar B

विधानसभा अधिवेशन स्थगित

Amit Kulkarni

कुंकळळीतील ‘क्वालिटी फुड्स’च्या विरोधात गुन्हा दाखल

Patil_p

संचारबंदीला वाळपई परिसरात 50 टक्के प्रतिसाद

Amit Kulkarni

कार्यकर्तेच ठरवतील काँग्रेसचे उमेदवार

Amit Kulkarni

वादळी वाऱयामुळे सत्तरीत पडझड

Amit Kulkarni
error: Content is protected !!