तरुण भारत

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्याची विकासाकडे वाटचाल

केरी शंकरनाथ मठाचे मठाधीश चंद्रकांत गावस यांचे उद्गार

वाळपई  / प्रतिनिधी

Advertisements

 डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा राज्याची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. सर्व घटकांना एका धाग्यात गुंफून डॉ. सावंत हे राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. विकासाकडे त्यांची पाहण्याची नजर व गोव्यातील सर्व भागातून त्यांना वाढता पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱया काळात गोव्याला विकासाची आणखी गती प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन केरी सत्तरी येथील शंकरनाथ सांप्रदायाचे मठाधीश परमपूजनीय चंद्रकांत गावस यांनी केली आहे. दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या छोटय़ाशा कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा त्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

 यावेळी आशीर्वचन झालेल्या एका खास कार्यक्रमात त्यांनी प्रमोद सावंत यांना आशीर्वाद दिले व देशाच्या व राज्याच्या विकासासाठी आपले कार्य निश्चितच यशस्वी ठरेल असेही आशीर्वाद दिले. केरी येथील शंकर नाथ संप्रदायाच्या विस्तारात गोव्यात मोठय़ा प्रमाणात वाढ होऊ लागलेली आहे. दरवषी मोठय़ा प्रमाणात दत्त जयंती व इतर धार्मिक कार्यक्रम या मठाच्या परिसरात होताना दिसतात. गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे खासदार श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने या मठाच्या परिसरामध्ये विकासकामे होताना दिसत आहेत. दत्तजयंतीनिमित्त यंदा मोठय़ा प्रमाणात भाविकांनी भेटी देऊन आशीर्वाद घेतले.

रात्री उशिरा डॉ. प्रमोद सावंत यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  यावेळी मठाधीश परमपूजनीय चंद्रकांत गावस यांच्या हस्ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

   संत संप्रदायाच्या माध्यमातून आज समाजामध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार निर्माण होताना दिसत आहेत. चांगले विचार जर आपल्याला लाभले तर आपले जीवन आनंदमय व निरोगीमय होत असते. यामुळे संत संप्रदाय यांचे योगदान आज महत्त्वाचे ठरलेले आहे. येणाऱया काळात या संप्रदायाला आपल्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य लाभणार असल्याचे आश्वासन यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

  दत्त जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त सकाळपासून या आश्रमात धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पाद्यपूजा व जवळपास पंचवीस सांप्रदायिक यांनी अभिषेक केला. यावेळी खास भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते गोव्यातील प्रमुख गायक कलाकार गौतम गात्य गावस व किरण गावडे यांनी सुरेल गायन सादर केले. त्यांना हार्मोनियमवर अमोल गावस पकवाज गोपी गावस यांनी साथ संगत केली. यावे दत्तजन्म आरती महाप्रसाद व ह भ प श्रीकृष्ण हरिचंद्र गावस यांचा सुरेल कीर्तनाचा कार्यक्रम केला होता. त्यांना हार्मोनियमवर रमाकांत दळवी व तबल्यावर गणपत गावस यांनी साथ संगत केली.

  त्यानंतर रात्री उशिरा दशावतारी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. यंदा मोठय़ा प्रमाणात भाविकांनी दत्त जयंती मध्ये सहभाग दर्शवून हा कार्यक्रम उत्साहात पार पडण्यासाठी आयोजकांना सहकार्य केले.

यावेळी मठाच्या समितीचे अध्यक्ष, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर व आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

प्रत्येक कुटूंब भाजपमय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

Patil_p

भाजपात प्रवेश केल्याने काणकोणचा विकास करता आला

Omkar B

कळंगुटकवासीयांना शहरीकरण नको असल्यास अध्यादेश रोखणार : मंत्री लोबो

Amit Kulkarni

वनिता फडते यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन

Amit Kulkarni

भारताच्या खऱया इतिहासाला अभ्यासक्रमात स्थान द्या

Patil_p

जि.पं. पालिका निवडणुका एकाचवेळी

Omkar B
error: Content is protected !!