तरुण भारत

उचगाव मराठी साहित्य संमेलन 24 जानेवारीला घेण्याचा निर्णय

वार्ताहर/ उचगाव

उचगाव मराठी साहित्य संमेलन अकादमी आयोजित विसावे (20) मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 24 जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Advertisements

सीमाभागामध्ये कडोलीनंतर तालुक्यात दुसऱया क्रमांकाने सुरू करण्यात आलेल्या या अकादमीने बघता बघता वीस वर्षे दर्जेदार साहित्य संमेलने भरवून साहित्य रसिकांची मने जिंकली. मात्र यंदाच्या साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट असल्याने चालू वर्षी संमेलनाचा सोहळा भव्य-दिव्य स्वरुपाचा न करता साधेपणानेच करण्याचे सर्वानुमते बैठकीत ठरविण्यात आले. उचगाव पंचक्रोशीतील जागृत मळेकरणी देवीच्या अमराईतील मळेकरणी देवी सभामंडपामध्ये हे संमेलन होणार आहे.

बैठकीत इतर साधक बाधक चर्चा करण्यात आली व संमेलनाचे अध्यक्ष, वक्ते, संमेलनाची सत्र, पाहुण्यांचे नियोजन, याबाबत पुढील बैठकीत चर्चा करून संमेलनाची रुपरेषा जाहीर करण्याबाबत ठरविण्यात आले.

स्वागत अकादमीचे उपाध्यक्ष कृष्णा कदम-पाटील यांनी केले. सेक्रेटरी एन. ओ. चौगुले यांनी आभार मानले.

Related Stories

चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलगुरुंची उच्च शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार

Amit Kulkarni

संजय कवटगीमठ यांचे संचालकपद रद्द करण्याचे आदेश

Patil_p

शिवाजीनगरचे समुदाय भवन विठुरायाच्या गजराने दुमदुमले

Patil_p

बिम्स हॉस्पिटलला वैद्यकीय उपकरणांची मदत

Omkar B

तिसऱया रेल्वेगेटजवळ धाडसी दरोडा

Omkar B

परिवहनच्या बस रुग्णवाहिकेबाबत बेळगावला ठेंगा

Patil_p
error: Content is protected !!