तरुण भारत

अरबाज खान, सोहेल खान, निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई :


अभिनेता अरबाज खान, सोहेल खान व सोहेल खानचा मुलगा निर्वाण खान यांच्या विरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. 

25 डिसेंबर रोजी हे तिघेही यूएईवरून मुंबईत परतले होते. मात्र मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बुकींग असल्याचे सांगून ते परस्पर घरी निघून गेले होते. एकीकडे कोरोनाचे नवे संकट येत असताना, बॉलिवूडमधील बड्या कलाकारांकडून अशा प्रकारचा हलगर्जीपणा केला जात आहे. 


नव्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार ब्रिटन व यूएईवरून आलेल्या प्रवाशांता सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात रहावे लागते. त्यानुसार त्यांचे बुकींग हे ताज लॅण्डमध्ये करण्यात आले होते.

त्यानुसार 26 डिसेंबर रोजी महापालिकेने जेव्हा आढावा घेतला, तेव्हा ते तिघे तिथे गेलेच नसल्याचे समोर आले. हे तिघे परस्पर घरी गेल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे आता मुंबई महापालिकेकडून त्यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

Related Stories

सुबोध भावाचा सणसणीत टोला ,”२० मीटरच अंतर पार केलं तर देश बदलेल”

triratna

स्टार प्रवाहवर दोन नव्या मालिकांचा श्रीगणेशा

Patil_p

मोगरा : मराठीतील पहिले-वहिले ऑनलाईन लाईव्ह नाटक

Patil_p

कोरोना योद्धय़ांना कवितेतून सलाम

Patil_p

12 दिवसांत दिलीप कुमार यांच्या आणखी एका भावाचे कोरोनामुळे निधन

pradnya p

विवादानंतर कंगनाला उपरती; कंगना म्हणाली…

pradnya p
error: Content is protected !!