तरुण भारत

20 वर्षांपासून राजहंसगडावर एकच पॅनेलची बाजी

प्रतिनिधी/बेळगाव

मागील 20 ते 25 वर्षांपासून राजहंसगडावर एकाच पॅनेलने बाजी मारली आहे. कोणत्याही परिस्थितीत येथील नागरिकांनी एकाच पॅनेलला साथ देऊन गावचा विकास साधला आहे. भाजपप्रणित ग्रामविकास आघाडी पॅनेल असून त्यांनी यावेळीही चांगली घोडदौड ठेवली आहे. सुळगा (ये.) ग्राम पंचायतीच्या अखत्यारीत येणाऱया राजहंसगड येथे ग्रामविकास आघाडीने आपली परंपरा कायम ठेवून पुन्हा विजय मिळविला आहे.

Advertisements

शाम थोरवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती. राजहंसगड येथील वॉर्ड क्रमांक 2 मधून सुमित्रा तावशे-297, जोतिबा थोरवत 305 मते घेऊन तर वॉर्ड क्रमांक 3 मधून लक्ष्मी तावशे-309 व दत्ता पवार यांनी 310 मते घेऊन विजयी झाले आहेत. यावेळी आतषबाजी व गुलालाची उधळण करत त्यांचे ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले..

Related Stories

संवेदनशील भागावर पोलिसांचे विशेष लक्ष

Amit Kulkarni

महिन्यानंतरही मृत्यूबाबतची नोंद नाही!

Omkar B

तीन चाकी मोटारसायकलसाठी दिव्यांगांना आवाहन

Patil_p

कॅन्टोन्मेंटमध्ये व्हेईकल एन्ट्री फी वसुलीला ब्रेक

Amit Kulkarni

रुद्राक्ष प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

Patil_p

ध्वज बदलण्यासाठी गेलेल्यांना अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!