तरुण भारत

कुद्रेमनीत ऊस मळय़ाला आग सव्वाचार लाखांचे नुकसान

वार्ताहर/ कुद्रेमनी

शॉर्टसर्किटमुळे ऊस मळय़ाला आग लागून शेतकऱयाचे चार ते सव्वाचार लाखांचे नुकसान झाल्याची घटना कुद्रेमनी गावच्या शेतवडीत घडली. गावातील शेतकरी मारुती महादेव तोंदले व उत्तम नारायण पाटील असे नुकसानग्रस्त शेतकऱयांची नावे आहेत. विद्युततारांचा एकमेकाला स्पर्श होऊन पडलेल्या आगीच्या ठिणगीने ऊस मळय़ाला भरदुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

Advertisements

गावच्या रांगी-वडरगे शेतजमिनीत अनेक वर्षापासून शेतकरी चांगले उत्पादन उसाचे घेतात. साडेचार एकर जमिनीत उसाची लागवड होती. उसाचे पीक यंदा चांगलेच उत्पादन देणारे होते. पण आगीमुळे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती शेतकऱयांनी दिली आहे.

हेस्कॉमचे बेनकनहळ्ळी जंक्शन अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. नुकसानभरपाई मिळावी, अशी शेतकऱयांनी मागणी केली आहे.

Related Stories

जय भवानी महिला सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Patil_p

सेलडीडविषयी तात्काळ निर्णय घ्या

Patil_p

जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

Rohan_P

सार्वजनिक गणेशोत्सव मंडपासाठी परवानगी

Amit Kulkarni

हंगामी स्वच्छता कामगारांनाही 30 लाख नुकसान भरपाई

Patil_p

बेळगाव एपीएमसी अध्यक्षपदी युवराज कदम

Rohan_P
error: Content is protected !!