तरुण भारत

किल्ले अजिंक्यताऱयाच्या दरवाजाजवळील स्वच्छता

प्रतिनिधी/ सातारा

जो किल्ला कधीही दुश्मनांना जिंकता आला नाही. त्या किल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. ती कचराकुंडी तब्बल दोन महिन्यापासून ओसांडून वाहत होती. शिवभक्तांनी आणि साताऱयातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या कचराकुंडी व परिसराची स्वच्छता करण्याची विनंती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडे केली होती. शेंडे यांनी आरोग्य विभागास सुचना देताच किल्याच्या प्रवेशद्वाराजवळील ती कुंडीतील कचरा उचलून सोनगाव कचरा डेपोत टाकण्यात आला. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे केवळ आश्वासन देवून थांबत नाहीत तर प्रत्यक्ष काम झाले की नाही याचीही पहाणी करतात त्यामुळे स्वच्छता करण्यात आली.

Advertisements

सातारा शहर स्वच्छ झाले पाहिजे नागरिकांना कोणतीही समस्या भेडसावली गेली नाही पाहिजे यासाठी स्वतः उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे कार्यतत्पर राहत आहेत. कुठल्याही पेठेतल्या नागरिकांने फोन करुन विनंती केली अन त्यांचे काम झाले नाही असे कधीच झाले नाही. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पाणी पुरवठय़ाबरोबरच कचऱयाच्या, लाईटच्या सर्वच समस्या सोडविण्यासाठी ते तत्पर आहेत. ऐतिहासिक अशा किल्ले अजिंक्यताऱयावर दररोज जाणाऱया मंडळींकडून जो काही कचरा होतो. तो कचरा किल्याच्या प्रवेशद्वाराजवळील कचरा कुंडीत टाकण्यात येतो. ती कचरा कुंडी गेल्या दोन महिन्यापासून भरुन वाहत होती. गडावर दररोज जाणाऱया शिवभक्तांना ती कचरा कुंडी तशीच दिसत होती. त्यामुळे शिवभक्तांनी सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांच्याकडे कचरा कुंडीबाबत तक्रार केली. रवी पवार यांनी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडे विनंती करताच उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी आरोग्य विभागास किल्याच्या परिसरात व दरवाजा परिसरात जो कचरा दिसेल तो उचला, अशा सुचना दिल्या. आरोग्य विभागाने कचरा उचलला. यापुढेही किल्याच्या प्रवेशद्वाराजवळील कचरा नित्यनियमाने उचलला जाणार आहे, असेही सामाजिक कार्यकर्त्यांना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी आश्वासन दिले.

Related Stories

पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Rohan_P

ऑनलाईन शिक्षण ठरतेय जीवघेणे

Omkar B

सातारा : भाटमरळीत ‘महिलाराज’

datta jadhav

अजित पवारांनंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची बाधा

pradnya p

एकाच दिवसातील तीन मृत्यूमुळे मंत्री मुश्रीफ तडक पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयात

triratna

अंत्यसंस्कारासाठीचे अनुदान जातेय कुठे

Patil_p
error: Content is protected !!