तरुण भारत

ताज महाल परिसरात फडकवला भगवा; चौघांना अटक

ऑनलाईन टीम / आग्रा : 


ताज महाल परिसरात हिंदुत्ववादी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी आज ताज महल परिसरात भगवा फडकवून शिव चालिसाचे पठण केले. यावेळी ताज महल परिसरात तैनात असलेल्या अर्ध सैनिक दलाच्या जवानांनी या चौघांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांकडे सोपवले. या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी हिंदू जागरण मंच या संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौरव ठाकूरसह चार जणांनी ताज महल परिसरात येऊन जय श्रीराम अशी घोषणा करत भगवा फडकवला. त्यानंतर त्यांनी शिव चालिसाचे पठणही केले. आणि या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. यातील एक व्हिडीओ 15 सेकंदाचा आहे, तर दुसरा व्हिडीओ 23 सेकंदाचा आहे. 


एसएसपी बबलू कुमार यांनी सांगितले की, या कथित व्हिडीओमध्ये गौरव ठाकूर, ऋषी लवानिया, सोनू बघेल आणि विशेष कुमार हे चौघेही झेंडा भडकवताना दिसत आहेत. या प्रकरणी चौघांवर आयपीसी कलम 152 अ अन्वये ताजगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.

दरम्यान, हिंदू जागरण मंचाच्या या कार्यकर्त्यांनी  प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि युट्यूबवर त्यांचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी जाणूनबुजून ताज परिसरात झेंडे फडकावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

देशात 47,262 नवे बाधित

datta jadhav

…काय अंगार-भंगार काय घोषणा लावलीय?, तुमच्यावर हेच संस्कार आहेत का ? : पंकजा मुंडे

Rohan_P

विक्रमी लसीकरणाचा ‘योगा’योग

Patil_p

दिलासादायक : महाराष्ट्रात मागील 24 तासात 60,226 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

मतदारांना लाच, खासदाराला शिक्षा

Patil_p

विद्यापीठ परीक्षा ऑनलाईन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!