तरुण भारत

नवख्या उमेदवारांना संधी देऊन विकासाची केली अपेक्षा

वार्ताहर / उचगाव

उचगाव ग्राम पंचायतीच्या चुरशीने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी नवीन चेहऱयांना संधी देऊन गावच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा व्यक्त केल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत 11 महिला तर 10 पुरुष निवडून येऊन महिलांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कोणत्याही पक्षाचे लेबल न लावता स्वबळावर उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. माजी ग्राम पंचायत अध्यक्ष योगिता बाळासाहेब देसाई यांची ग्राम पंचायतीवर दुसऱयांदा वर्णी लावली आहे. सध्या सर्वांना अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या आरक्षणाची उत्सुकता लागली आहे.

Advertisements

उचगाव, बसुर्ते व कोनेवाडी या तीन गावांमधील वॉर्डाप्रमाणे विजयी उमेदवारांना निवडणूक अधिकारी भास्कर देशपांडे, सुरजीत सावंत व अभिवृद्धी अधिकारी वीणा हलवाई यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.

नागरत्न संजय कोरडे, योगिता उमाजीराव उर्फ बाळासाहेब देसाई, लक्ष्मण धाकलू चौगुले, स्मिता मारुती खांडेकर, अंजना मधुकर जाधव, उमेश कृष्णा बुवा, गजानन अनंत नाईक, जाविद मोहिद्दीन जमादार, मधुरा बाळकृष्ण तेरसे, बाळकृष्ण खाचू तेरसे, रुपाली योगेश गिरी, अम्रिन सिराज बंकापूर, बळवंतराव उर्फ बंटी जयवंतराव पावशे, अनुसया लक्ष्मण कोलकार, यादो लुमाण्णा कांबळे, रुपा अशोक गोधळी, सूरज मल्लाप्पा सुतार, लक्ष्मी रामा कुऱहाडे, दत्तात्रय धाकलू बेनके, माधुरी वैजनाथ पाटील, मोनाप्पा नारायण पाटील हे नवनिर्वाचित सदस्य बनले आहेत.

Related Stories

सोमवारपासून न्यायालये सुरू

Omkar B

नागनाथ सोसायटीतर्फे ग्रा.पं.सदस्यांचा सत्कार

Amit Kulkarni

कुदेमानी ग्रा.पं. अध्यक्षपदी रेणुका नाईक

Amit Kulkarni

परराज्यातील नागरीकांना क्वारंटाईन करण्याचा ताण झाला कमी

Patil_p

कावळेवाडीच्या प्रेमवर कौतुकाची थाप

Patil_p

वेटलिफ्टर अक्षता कामतीला इन्स्टिटय़ूशनल अवॉर्ड

Amit Kulkarni
error: Content is protected !!