तरुण भारत

कर्नाटक : राज्यात मंगळवारी ८१५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना पॉझिटिव्ह दर कमी होत आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्याच बरोबर मृतांची संख्याही वाढली. मंगळवारी राज्यात ८१५ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात १३७७ रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले. तर ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

दरम्यान राज्यात सध्या ९,६३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत १२,११८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९,०१,५७९ वर पोहोचली आहे. तर यापैकी ९,२३,३५३ रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले आहेत.

तसेच आरोग्य विभागाने राज्यात गेल्या २४ तासात ११,४४५ रॅपिड प्रतिजैविक आणि १,११,६२२ आरटी-पीसीआर चाचण्यांसह एकूण १,२३,०६७ नमुन्यांची तपासणी केली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात ३९३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यासह जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३९०३४८ वर पोहोचली आहे. तर यापैकी ३७९८६७ रुग कोरोनमुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान मंगळवारी ६ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या उपचारात असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ६,१४७ इतकी आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत ४,३३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

Related Stories

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसची राज्यव्यापी सायकल रॅली

Amit Kulkarni

आम्हाला राज्यातील जनतेचे आरोग्य महत्त्वाचे

Amit Kulkarni

संशोधन निर्देशांकात कर्नाटक आघाडीवर

Patil_p

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिक्षक मित्र अ‍ॅप लाँच

Abhijeet Shinde

यंदाच्या अधिवेशनातच गोहत्या बंदी विधेयक मांडणार

Patil_p

शाळा सुरू करण्यासंबंधी आठवडाभरात निर्णय घेणार

Patil_p
error: Content is protected !!