तरुण भारत

ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये साखर उत्पादन 42 टक्क्यांनी वधारले

वाढीसह 110.22 लाख टनावर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

भारतात साखरेचे उत्पादन ऑक्टोबर-डिसेंबरच्या दरम्यान वर्षाच्या आधारे 42 टक्क्यांनी वधारुन 110.22 लाख टनावर राहिले आहे. व्यापारी आकडेवारीतून ही माहिती दिली आहे. अधिकचे झालेले ऊस उत्पादन तसेच महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्याचा हंगाम लवकर सुरु झाल्याने उत्पादनाने वेग पकडला आहे. साखर व्यापारी वर्ष ऑक्टोबर-सप्टेंबरदरम्यान असते.

भारतीय साखर कारखाना संघ (इस्मा) यांच्या माहितीनुसार साखर कारखान्याने वर्ष 2020-21 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरच्या कालावधीत 110.22 लाख टन साखर उत्पादन केले असून मागील वर्षातील याच कालवधीत 77.63 लाख टन साखर उत्पादन झाले होते.

काही कालावधीत महाराष्ट्रामध्ये साखर उत्पादन 39.86 लाख टन राहिले तर एक वर्षातील समान कालावधीत हा आकडा 16.50 लाख टन राहिला होता.

सरकारने साखरेचा अधिकचा असणारा साठा खपावा यासाठी सप्टेंबरमध्ये समाप्त झालेल्या विपणन वर्ष 2020-21 च्या दरम्यान 60 लाख टन साखर निर्यातीचे ध्येय निश्चित केले आहे. इस्माने दिलेल्या माहितीनुसार दुसऱया सर्वात मोठय़ा साखर निर्यात देशात थायलंडचा समावेश राहिलेला आहे. भारताकडून पश्चिम आशिया, श्रीलंका, बांगलादेश आदी देशांना साखर निर्यात होते.

Related Stories

35 टक्के कमी कच्चे तेल मागवणार

Patil_p

एसबीआय बिगर बँकिंग कंपन्यांच्या मदतीने एमएसएमईला देणार कर्ज?

Omkar B

व्हर्च्युअल व्हीजिटींग कार्डची सुविधा आता गुगलवर उपलब्ध

Patil_p

टेस्लाच्या समभागांचा 550 टक्क्यांचा परतावा

Omkar B

दुसऱया दिवशी सेन्सेक्सची 190 अंकांची घसरण

Patil_p

पेटीएम 250 कोटीचे समभाग कर्मचाऱयांना देणार

Patil_p
error: Content is protected !!