तरुण भारत

बँक-आयटीच्या कामगिरीने बाजार नव्या उंचीवर

सलग दहाव्या दिवशी तेजीः सेन्सेक्स 261 अंकांनी वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील सलग दुसऱया दिवशी मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने सलग दहाव्या दिवशी तेजी कायम राखल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 261 अंकांच्या तेजीसोबत नवीन विक्रम नेंदवत बंद झाला आहे.

प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत एचडीएफसी बँक, एचडीएफसी, ऍक्सिस बँक आणि टीसीएस यांच्या समभागांनी मजबूत तेजी प्राप्त केली आहे. प्रारंभीच्या दरम्यान शेअर बाजारात नकारात्मक कल राहिला होता. परंतु यातून सावरत सेन्सेक्सने 260.98 अंकांची तेजी मिळवत निर्देशांक 48,437.78 वर बंद झाला आहे. दरम्यानच्या काळात सेन्सेक्सने 48,486.24 अंकांचा टप्पा पार केला होता तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 66.60 अंकांनी वधारुन निर्देशांक 14,199.50 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसअखेर ऍक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक सहा टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. सोबत एचडीएफसी, इंडसइंड बँक, टीसीएस, एशियन पेन्ट्स, टायटन, एचसीएल टेक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये ओएनजीसी, बजाज फायनान्स, एनटीपीसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा समावेश घसरणीत राहिला आहे.

चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी प्रारंभीच्या काळात बाजार घसरणीत राहिला होता, परंतु तो काही वेळात सावरत पुन्हा नव्या उमेदीने मजबूत राहिला आहे. प्रमुख क्षेत्रांपैकी बँकिंग आणि आयटी कंपन्यांच्या कामगिरीने शेअर बाजार नव्या उंचीवर राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.

लसीकरणाचा प्रभाव

कोविड-19 संदर्भात सुधारणात्मक बदल पहावयास मिळत आहेत, कारण देशामध्ये लवकरच लसीकरणास सुरुवात होणार आहे. याचा परिणाम हा आर्थिक क्षेत्रात येणाऱया सकारात्मक बातम्यांमुळे शेअर बाजारात तेजीचा कल राहिला आहे.

Related Stories

कर्मचाऱयांच्या गैरहजेरीत ऑनलाईन कंपन्यांचा प्रवास रखडला

Patil_p

5जी स्पेक्ट्रम लिलाव लांबणीवर

Patil_p

बँकिंगच्या कामगिरीने बाजारात तेजीची लाट

Patil_p

केकेआरकडून रिलायन्स रिटेलला मिळाला धनादेश

Patil_p

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन वाढण्याची आशा

Patil_p

हय़ुंडाई करणार अमेरिकेत गुंतवणूक

Patil_p
error: Content is protected !!