तरुण भारत

महिला पोलिसाचा मुख्यमंत्र्यांकडून गैरव

माजगावच्या शुभांगी कांबळे यांची कामगिरी; सर्वत्र कैतुक

प्रतिनिधी/ नागठाणे  

Advertisements

तीन बांगलादेशी महिलांची वेश्या व्यवसायातून मुक्तता करणाया महिला पोलिसाचा नुकताच मुख्यमंत्र्याच्या हस्ते विशेष गैरव करण्यात आला. शुभांगी गौरव कांबळे असे या महिला पोलिसाचे नाव आहे. त्या माजगाव (ता. सातारा) येथील रहिवासी आहेत. 

शुभांगी कांबळे या सध्या मुंबई पोलिस दलातील मुख्य नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे त्या तिथे काम पाहतात. आपली सेवा बजावित असताना नियंत्रण कक्षात एका अनोळखी महिलेचा फोन आला. आपल्याला वेश्या व्यवसायासाठी मुंबई येथे आणल्याची माहिती तिने या वेळी पोलिसांना दिली. या माहितीनुसार शुभांगी कांबळे यांनी अत्यंत मेहनतीने तांत्रिक पद्धतीचा अवलंब करत संबंधित महिलेचे लोकेशन तपासले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या सतत संपर्कात राहून संबंधित महिलेपर्यंत पोचण्यात यश मिळविले. 

या महिलेकडून माहिती घेतल्यानंतर आणखी दोन महिलांनाही अशाच पद्धतीने व्यवसायासाठी मुंबईत आणले असल्याचे स्पष्ट झाले. या तिन्ही महिला मूळच्या बांगला देशातील होत्या. त्यांना वेश्या व्यवसायासाठी मुंबईत आणण्यात आले होते. या तिन्ही महिलांची पोलिसांनी सुटका केली. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी पोचविण्यासाठीही पोलिसांनी पुढाकार घेतला.

या प्रशंसनीय कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभांगी कांबळे यांचा विशेष गैरव करण्यात आला. या कार्यक्रमास मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह, सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील तसेच वरिष्ठ पोलिस अधिकायांची उपस्थिती होती. या यशाबद्दल माजगाव येथील ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी सै. कांबळे यांचे अभिनंदन केले.  

“केवळ एका फोनवरुन तीन महिलांची सुटका करणे, त्यांना त्यांच्या मूळ गावी पोचविणे हे मोठे आव्हान होते. पोलिस अधिकायांचे मार्गदर्शन, सहकायांचे सहकार्य यामुळे हे शक्य झाले.”

Related Stories

आठ तासांच्या बचावकार्यानंतर मुंबईतील नौका सुखरूप जयगड बंदरात

triratna

धोका वाढला : नागपूरमध्ये दिवसभरात 3,235 नवे कोरोना रुग्ण; 35 मृत्यू

pradnya p

रॅट चाचणीत त्रुटी आढळल्याने 2 लॅब बंद

datta jadhav

कराडमध्ये घंटागाडीचे चालक संपावर

Patil_p

सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल २६० कोरोना पॉझिटीव्ह

Shankar_P

कोरोना संपवायचाय अन जगायचंय पण..

Patil_p
error: Content is protected !!