तरुण भारत

सवलतीने अन्नधान्याची आवश्यकता नसलेल्यांनी स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडावे

जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांनी केले आवाहन


प्रतिनिधी / सातारा

Advertisements

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना जर त्यांना सवलतीलच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसलेल्यांनी स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडील 19 ऑक्टोबर 2016 रोजीच्या शासननिर्णयानुसार सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसेल तर मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय शासनाने उपलब्ध करुन दिला आहे.

सातारा जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठी इष्टांक पूर्तता जरी झालेली असली तरी वेळोवेळी असेही निदर्शनास आले आहे की जे खरोखरच गरजू व गरीब आहेत, ज्यात हात गाडीवाले, कचरा वेचून उदरनिर्वाह करणारे,भूमीहीन, अल्पभूधारक, कामगार, अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे, विधवा, परितक्त्या, ग्रामीण भागातील कारागीर, झोपडपट्टीतील रहिवासी, हमाल इत्यादिंना या योजनेचा लाभ देणे क्रमप्राप्त असताना अद्यापी काही पात्र कुटुंबांना व व्यक्तींना या योजनांचा लाभ मिळालेला नाही. अशा गरीब व गरजु व्यक्तींना या योजनेमध्ये समाविष्ट करुन घेण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांचेमार्फत आवाहन करण्यात येत आहे, की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जे लाभार्थी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत परंतू त्यांचे उत्पन्न आता वाढलेले आहे.

अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छने सवलतीच्या दराने अन्नधान्य घेण्याच्या योजनेतून बाहेर पडण्याची तयारी दर्शविली तर अशा लाभार्थ्यांना सद्यस्थितीत मिळणारा लाभ अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रु.44 हजार इतके अथवा त्यापेक्षा कमी व शहरी भागात रु 59 हजार इतके अथवा त्यापेक्षा कमी या निकषास पात्र असूनही या लाभापासून वंचित आहेत त्यांना अन्नधान्याचा लाभ मिळू शकेल .

केंद्र शासनातर्फे घरगुती वापराच्या गॅसवर ‘अनुदानातून बाहेर पडा’ या नावाने योजना सुरु केली आहे. अनेक लाभार्थी या योजनेमध्ये समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे शासनाची मोठ्या प्रमाणात अनुदानाच्या निधीची बचत झाली आहे. याच धर्तीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्याकरिता पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना जर त्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसेल तर सवलतीच्या दराने मिळणारे अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय शासनाने उपलब्ध करुन दिला आहे. सातारा जिल्ह्यात सद्यस्थितीत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांपैकी अथवा त्यांचे कुटुंबातील कोणी सदस्य डॉक्टर, स्थापत्य विशारद, चार्टर्ड अकाऊटंट आहेत. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यवसाय विक्रीकर किंवा आयकर भरतात तसेच चारचाकी यांत्रिक वाहन आहे. (टॅक्सी व रिक्षाचालक वगळून), ज्यांचेकडे बंगला आहे. ज्यांचे कुटुंबात निवृत्ती वेतनधारक अथवा नोकरदार व्यक्ती आहेत.

व ज्यांचे उत्पन्न ग्रामीण भागात रु.44 हजारपेक्षा जास्त शहरी भागात रुपये 59 हजारपेक्षा जास्त आहे. त्यांनी या योजनेतून स्वेच्छेने बाहेर पडावे. व देशाच्या सक्षमीकरणास व बळकट करण्यास साथ द्यावी असे अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या योजनोमध्ये सधन लाभार्थ्यांनी सहभागी होण्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा नियम 2013 अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्या‍करिता शासनावर येणारा भार कमी होण्यास व योग्य व गरजू लाभर्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधन्याचा लाभ मिळावा या उद्दीष्टाची पूर्तता होण्यास मदत होणार आहे.

अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या योजनेत समाविष्ट होणेसाठी नमुना अर्ज रास्तभाव दुकानदार यांचेकडे उपलब्ध असून सदर अर्ज भरुन रास्तभाव दुकानदार यांच्याकडे 31 जानेवारी 2021 अखेर जमा करावेत. सातारा जिल्ह्यातील अन्न सुरक्षा योजनेतील सधन लाभार्थ्यांनी अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या मोहिमेत जास्तीत जास्त प्रमाणात व संख्येने सहभागी होऊन गरीब व गरजू लोकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्यास हातभार लावून समाजहित व देशहीत जपुन देशास बळकट करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग व्हावे, असे आवाहन शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा यांचे मार्फत करण्यात येत आहे.

Related Stories

सात महिन्यानंतर हॉटेल-रेस्टॉरंट सेवेत

Patil_p

सातारा : धोका वाढतोय; म्युकरमायकोसिसचे २८ रुग्ण

triratna

ऑनलाईन शाळा सुरु होण्याच्या नुसत्याच वावडय़ा

Patil_p

तुमची मस्ती एका दिवसात उतरेल : खा. उदयनराजे

datta jadhav

कराडमध्ये टेस्टींग वाढवण्याच्या सूचना

Patil_p

कृष्णा कारखान्याची निवडणूक 26 जूनला?

Patil_p
error: Content is protected !!