तरुण भारत

अमेरिकेत लवकरच दिवसात 10 लाख जणांचे लसीकरण

मंदगतीने प्रारंभानंतरही अमेरिकेत लवकरच कोविड-19 चे मान 10 लाख डोस प्रतिदिन दिले जाणार आहेत. देशात पुढील काही आठवडय़ांमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेतील साथरोगतज्ञ डॉ. ऍथनी फौसी यांनी म्हटले आहे. एखादा मोठा कार्यक्रम सुरू केल्यावर काही समस्या समोर येत असतात. अमेरिकेत या समस्या आता दूर करण्यात आल्याचे वाटते. कोरोनावरील लसीकरण 14 डिसेंबर रोजी सुरू झाले होते आणि आता मोहिमेने वेग पकडण्यास प्रारंभ केला आहे. सध्या एका दिवसात सुमारे 5 लाख डोस दिले जात आहेत. सुटीचा काळ संपल्यावर एका दिवसात 10 लाख किंवा त्याहून अधिक डोस दिले जातील. नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांचे 100 दिवसांत 10 कोटी डोस देण्याचे लक्ष्य अत्यंत वास्तविक, महत्त्वपूर्ण आणि प्राप्त करण्यासारखे असल्याचे उद्गार फौसी यांनी काढले आहेत.

Related Stories

नीरव मोदीला ब्रिटनच्या न्यायालयाकडून आणखी एक झटका

datta jadhav

महामारीची तिसरी लाट

Patil_p

आळशी लोक ‘नायक’

Patil_p

तालिबानी हिंसेत पाकिस्तानी सैन्य सामील

Patil_p

हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या ट्रायलला बंदी : WHO

datta jadhav

चीन 20 हजार कोरोनाग्रस्तांना मारणार ही अफवाच

prashant_c
error: Content is protected !!