तरुण भारत

डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांचा कॅपिटॉल इमारतीत धुडगूस; गोळीबारात एक महिलेचा मृत्यू

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 


2020 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर अजूनही पेच सुरू आहेत. यातच राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घालत हिंसाचार केला आहे. ट्रम्प यांचे समर्थक वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यामध्ये एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि आंदोलकांमध्ये जवळपास चार तास झटापट सुरु होती. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुन्हा एकदा कॅपिटॉल इमारतीभोवती सुरक्षाव्यवस्था सुरळीत केली. 


जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प यांचे समर्थक इमारतीबाहेर उपस्थित होते. बैठक सुरु असतानाच आंदोलकांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आणि इमारतीत प्रवेश केला.

  • ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई

अमेरिकेत झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई केली आहे. ट्विटरने 12 तासांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट ब्लॉक केले आहे तसेच त्यांचे तीन व्हिडीओ हटवले आहेत. या व्हिडीओंमुळे हिंसाचार भडकण्याची भीती असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. यासोबतच ट्विटरने नियमांचे उल्लंघन झाल्यास अकाऊंट कायमचे बंद करण्याचा इशारा दिला आहे.

  • फेसबुकनेही केली कारवाई

फेसबुकनेही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई केली आहे. हिंसाचार सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प संबोधित करत असतानाचा व्हिडीओ फेसबुकने हटवला आहे.

Related Stories

अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती स्फोट; जवळपास 43 जण जखमी

Rohan_P

संघटनेची अनुमती

Patil_p

हुकूमशाह जनतेसमोर रडले

datta jadhav

कर्करोगग्रस्त आईला घडविणार जगाची सैर

Patil_p

कोलिन पॉवेल यांचे निधन

Patil_p

भारतात हल्ला घडवण्याचा कट

Patil_p
error: Content is protected !!