तरुण भारत

पोलीस भरतीबाबतचा जीआर रद्द : गृहमंत्री

  • सरकार लवकरच शुद्धीपत्रक काढणार 


ऑनलाईन टीम / मुंबई : 


पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गृहविभागाने 4 जानेवारी रोजी काढलेला जीआर रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.

Advertisements


ते म्हणाले, एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग आता नवीन जीआर शुद्धीपत्रक काढण्यात येणार आहे. 4 जानेवारी रोजी गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. त्याला विरोध झाल्यानंतर गृहविभागाने निर्णय रद्द केला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

देशमुख म्हणाले की, पोलीस शिपाई भरती 2019 करीता ज्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले.

एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीबाबत गृहविभागाने 4 जानेवारी रोजी जीआर काढला होता. एसईबीसीचे आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेतला होता. यात ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार असे सांगितले होते. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा असे या निर्णयात म्हटले होते.

Related Stories

सांगली जिल्ह्यात २० हजार रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करणार : जिल्हाधिकारी

triratna

चिंताजनक : महाराष्ट्रात आतापर्यंत ‘ब्लॅक फंगस’चे 5,763 रुग्ण

pradnya p

ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाची एन्ट्री

Patil_p

घरफोडी करणाऱ्या तरुणास अटक

Shankar_P

”दीदी ओ दीदी.. म्हणणारे दादा कुठे गेले?”

triratna

जम्मू-काश्मीर: सोपोरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

Shankar_P
error: Content is protected !!