तरुण भारत

निवृत्त मुख्याध्यापक ए. के. पाटील यांचा सत्कार

प्रतिनिधी/ बेळगाव

अनगोळ येथील मराठी मुला, मुलींची प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ए. के. पाटील हे प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनिमित्त शाळेच्यावतीने त्यांचा सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नीचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षा मेघा कंग्राळकर होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनिता कणबर्गी, वैशाली देऊसकर या होत्या.

Advertisements

प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जयश्री पाटील यांनी परिचय करुन दिला. यावेळी कांबळे, कुंभार यांनी तसेच सविता चंदगडकर, वैशाली देऊसकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. मुख्याध्यापक यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. अनगोळ क्लस्टर विभागाच्या सर्व मुख्याध्यापकांनी शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. सीआरपी सोनटक्की, सुनिता पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले तर आभार माया शेळके यांनी मानले.

Related Stories

अज्ञात वाहनाच्या ठोकरीने अनोळखीचा मृत्यू

Rohan_P

रोजंदारी कामगारांच्या कुटुंबांना जीनावश्यक वस्तूंची मदत

Patil_p

गांधीनगरजवळ पट्टणकुडी येथील वृद्धाची लूट

Amit Kulkarni

उड्डाणपुलावरील दुसऱया बाजूच्या रस्त्याची दुरुस्ती सुरू

Patil_p

पूर्वसूचना न देताच कारखाना बंद

Patil_p

दुसऱया किसान रेल्वेला रेल्वे राज्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा झेंडा

Patil_p
error: Content is protected !!