तरुण भारत

इलेक्ट्रिक दुचाकीचे दहा लाख विक्रीचे ध्येय अडचणीत

नवी दिल्ली

 वर्ष 2020 मध्ये फक्त 25,735 तीव्र गतीच्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री होण्यासोबतच फेम-दोन योजनेअंतर्गत मार्च 2022 पर्यंत निश्चित केलेले 10 लाख इलेक्ट्रिक वाहन विक्रीचे ध्येय प्राप्त करण्यात काही प्रमाणात अडचणी राहणार असल्याचे संकेत सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स (एसएमईव्ही) यांनी व्यक्त केले आहेत.

Advertisements

एसएमईव्हीनुसार तीव्र गतीच्या दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 2019 मध्ये 27,224 युनिटच्या तुलनेत 2020 मध्ये 5 टक्क्यांनी कमी राहिली आहे. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांचा वापर वाढविण्याची योजना (फेम-2) याच्याअंतर्गत आखण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहन उद्योग 2020 मध्ये प्रभावीत झाला असून 25,735 तीव्र गतीच्या दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे,

जी एक वर्षाच्या अगोदर 27,224 युनिट राहिली होती. यांच्या मदतीने फेम-2 योजनेअंतर्गत 10 लाख युनिटच्या विक्रीचे ध्येय प्राप्त करणे हे कठीण होणार आहे.

ध्येय निश्चित

संघटनेनुसार फेम-2 योजनेची सुरवात एप्रिल 2019 मध्ये झाली आहे. यांच्या अंतर्गत मार्च 2022 पर्यंत कमीत कमी 10 लाख उच्च गती इलेक्ट्रिक दुचाकी वाहन विक्रीचे ध्येय निश्चित केले आहे. सदरच्या ध्येय प्राप्तीचा प्रयत्न करत असताना आतापर्यंत 4 टक्क्यांचे ध्येय प्राप्त केले असल्याचे एसएमईव्हीचे महासंचालक सोहिंदर गिल यांनी सांगितले आहे. 

Related Stories

महिंद्रा डिझेल एक्सयुव्ही-500 बाजारात

Patil_p

हिरो मोटोकॉर्पने विकल्या 1 लाख दुचाकी

Amit Kulkarni

टोयोटा किर्लोस्करच्या कार विक्रीत 12 टक्के वाढ

Patil_p

सुझुकीची मोटरसायकल विक्री तेजीत

Amit Kulkarni

वोल्वोची 50 टक्के इलेक्ट्रीक वाहने

Patil_p

हिरोमोटोची नवी मास्टरो एज 110 बाजारात

Patil_p
error: Content is protected !!