तरुण भारत

हिरोची स्कूटर-मोटारसायकल खरेदी महागणार

1 जानेवारीपासून दरवाढः उत्पादन खर्च वाढला

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

वाहन निर्मिती कंपन्यांनी मागील महिन्यातच वाहनांच्या किमती वाढणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे 1 जानेवारी 2021 पासून अनेक कंपन्यांनी मॉडेलनुसार वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. हय़ुंडाईने अगोदरच नवीन किमती सादर केल्या आहेत. तर सध्या हिरो मोटोकॉर्पनेही स्कूटर आणि मोटारसायकलच्या नवीन किमतीची यादी सादर केली आहे. नवीन किमतीनुसार आता दुचाकीच्या किंमती 1900 रुपयापर्यंत वाढल्या आहेत. वाहन कंपन्यांनी उत्पादन खर्चात वाढ झाल्याने आणि अन्य खर्चामुळे हे दर वाढणार असल्याचे स्पष्ट केले होते.

सर्वाधिक 1900 रुपये किमत ही एक्सट्रीम 160 आरची झाली असून त्यापाठोपाठ एक्सपल्स 200 असून याची किमत ही 1,500 ने वाढविली आहे. सर्वाधिक विक्रीतील मॉडेलमध्ये स्प्लेंडर रेंज(स्प्लेंडर प्लस, स्प्लेंडर आयस्मार्ट आणि सुपर स्प्लेंडर) यांच्या किमती 450 रुपयांपासून ते 825 रुपयांपर्यंत वाढविल्या आहेत. हिरोच्या एचएफ डिलक्सची किमत ही 150 ते 1435 रुपयापर्यंत वाढविली आहे. आय3एस च्या मॉडेलच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.

Related Stories

महिंद्रा एक्सयुव्ही 300 बाजारात दाखल

Patil_p

देशात तयार केलेली एस-क्लास बाजारात

Patil_p

टाटा मोर्ट्सची नवी सफारी सादर

Patil_p

फोक्सवॅगनच्या उत्पादनावर परिणाम

Amit Kulkarni

ओकीनाव्हा डय़ूअल इलेक्ट्रीक स्कूटर

Patil_p

टाटा मोटर्सकडून सवलतीची ऑफर

Patil_p
error: Content is protected !!