तरुण भारत

देळे – काणकोण येथे उद्या स्वरमयी स्मरण

प्रतिनिधी / काणकोण

आयुष्यभर संगीतात रमलेल्या आणि संगीतातून ईश्वराची सेवा केलेल्या देळे-काणकोण येथील वै. पांडुरंग बा. ना. गावकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त 9 रोजी संध्याकाळी 5.30 वा. मातृपितृछाया, देळे येथे स्वरमयी स्मरण सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत कार्यक्रमात वसीम खाँ, प्राप्ती गावस, दुवी च्यारी, श्रेयस पैठणकर, उर्वी फडके, हेमा गावकर, आरती गावडे, पल्लवी पाटील, श्रीया टेंगसे, अश्विनी अभ्यंकर, मिताली चव्हाण आणि डॉ. प्रवीण गावकर हे सारंगीवादन, सुगम संगीत सादर करणार आहेत. त्यांना विष्णू शिरोडकर, यतीन तळावलीकर, अवधुत च्यारी, गोपाळ प्रभू, आणि उत्पल सायनेकर साथ करणार आहेत, तर सूत्रनिवेदन नेहा उपाध्ये करणार आहेत. या कार्यकमाचा भाग म्हणून आवडू उर्फ विमल गायकर यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. गावकर यांनी कळविले आहे.

Advertisements

Related Stories

मुलगी, नातवाच्या भेटीसाठी गेल्या व शारजात अडकून पडल्या…

Omkar B

कोरोनाचे 3 बळी, 117 नवे रुग्ण

Omkar B

धारगळ येथे टेलर ट्रकला आग केबिन जळून खाक

Amit Kulkarni

भविष्यातही जीसीएला मिळेल दिल्ली क्रिकेट संघटनेचे सहकार्यः विपुल फडके

Omkar B

कुडचडेत सर्वेक्षणास चांगला प्रतिसाद

Omkar B

’इफ्फी’ म्हणजे भाजपसाठी ’इंटरनल फिक्सिंग पॅस्टिवल’

Amit Kulkarni
error: Content is protected !!