तरुण भारत

वाळपई बनली पोलिसांची छावणी

उदय सावंत/वाळपई

 सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ मेळावली या ठिकाणी होणार असलेल्या आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातातील आंदोलनाने संपूर्ण गोव्याचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले आहे. आंदोलकांनी गुरुवारीही मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे काल गुरुवारी वाळपईत मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. संपूर्ण वाळपई शहराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. उच्च स्तरीय पोलीस अधिकाऱयांच्या बैठकीत आज शुक्रवारपासून मेळावलीत पुन्हा जमीन सर्वेक्षणाचे काम सुरु करण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे मेळावलीत आजही पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाळईला पोलीस छावणीचे स्वरुप

बुधवारी आंदोलक व पोलिसांच्या दरम्यान झालेल्या संघर्षात अनेक पोलीस जखमी झाले होते. यामुळे पोलीस खात्याची यंत्रणा सतर्क झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. पोलीस निरीक्षक सागर एकोसकर यांच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत आंदोलकांनी लावून धरले होती. त्या संदर्भात विचारणा करण्यासाठी पुन्हा एकदा शेळ मेळावली आंदोलकांनी वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. यामुळे पोलीस यंत्रणा अत्यंत सतर्क झाली.  काल गुरुवारी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सत्तरी तालुक्मयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच वाळपई शहराला पूर्णपणे छावणीचे स्वरूप आले होते. वन प्रशिक्षण केंद्रासमोर असलेल्या वाघेरी आयआरबी कॅम्पमध्ये गोव्याच्या अनेक पोलीस स्थानकांवरुन आणलेला मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

 वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची महत्वपूर्ण बैठक

दुसऱया बाजून वाळपई पोलीस स्थानकावर वरि÷ पोलीस अधिकाऱयाची संध्याकाळी उशिरापर्यंत महत्वाची बैठक सुरू होती. त्यामध्ये कोणत्या प्रकारचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात माहिती मिळू शकलेली नाही. मात्र खात्रीलायक गोटातून मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवारपासून पुन्हा एकदा भूमापन करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार असून यासंदर्भातील जोरदारपणे पूर्वतयारी करण्यात आल्याचे समजते.

शंभरपेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल

बुधवारी घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतलेली आहे. पोलिसांवर दगडफेक करून त्यांना जखमी करण्याच्या कारणाखाली जवळपास 100 पेक्षा जास्त जणावर जीवे मारण्याचा प्रयत्न, याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते व आम आदमी पक्षाचे विश्वेश परब यांना अटक करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. येणाऱया काळात इतरांवरही कारवाई होणार असल्याचे समजते.

गुरुवारचा मोर्चा अचानकपणे केला रद्द

वाळपईचे पोलीस निरीक्षक सागर एकोसकर यांनी महिलांवर पाय ठेवण्याच्या कारणास्तव पोलीस स्थानकावर मोर्चा नेऊन त्यांच्या निलंबनाची मागणी केली आंदोलकांनी लावून धरली आहे. बुधवार सायंकाळीपासून वाळपई पोलीस स्थानकावर सुरु असलेला मोर्चा रात्री उशिरा मागे घेण्यात आला होता. यासंबंधी सरकारने कोणत्या प्रकारची कारवाई केली, याची माहिती द्यावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करीत गुरुवारी संध्याकाळी चार वाजता आंदोलनकर्त्यांचा मोर्चा वाळपईच्या पोलीस स्थानकावर निश्चित करण्यात आला होता. ही माहिती पोलिसांना मिळतात होंडा पोलीस चौकीवर मोठय़ा प्रमाणात तैनात करण्यात आलेला पोलीस फौजफाटा वाळपईच्या दिशेने रवाना झाला. मात्र ऐनवेळी आंदोलकांनी कालचा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पोलीस यंत्रणेची बऱयाच प्रमाणात फजिती झाली.

गोव्याच्या अनेक भागांतून आला पोलीस फौजफाटा

दुपारी दोन वाजल्यापासून होंडा पोलिसचौकीवर तैनात करण्यात आलेला फौजफाटा त्याचप्रमाणे उत्तर व दक्षिण गोव्यामधील अनेक पोलिसस्थानकांवरील पोलिसांना तातडीने वाळपईत हजर राहण्याचे निर्देश पोलिस खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांकडून देण्यात आले. यामुळे साडेचार वाजेपर्यंत वाघेरी आयआरबी कॅम्पमध्ये मोठय़ा प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात झाला आहे. सायंकाळपर्यंत अनेक ठिकाणांहून पोलीस वाळपईत दाखल होण्याचे सत्र सुरुच होते.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची दीर्घकाळ गुप्त बैठक

वाळपईच्या आयआरबी कॅम्पमध्ये पोलिस खात्याच्या वरि÷ अधिकाऱयाबरोबर वेगवेगळय़ा विभागांचे उपअधीक्षक, अधीक्षक यांच्या दरम्यान बैठक सुरू होती. या बैठकीच्या माध्यमातून कोणता निर्णय झाला यासंदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

आज मेळावलीत पुन्हा होणार जमीन आरेखन

खात्रीलायक गोटातून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी बंद ठेवण्यात आलेले जमीन आरेखनाचे काम आज शुक्रवारी सकाळपासून सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. यासाठीची पूर्वतयारी मोठय़ा प्रमाणात करण्यासंदर्भात सविस्तरपणे चर्चा पोलिसांच्या बैठकीत करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकारने दिलेल्या निर्देशानुसार आयआयटीचे काम सुरु व्हायलाच हवे, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 पोलीस छावणीमुळे वाळपई शहरात वाहतूक कोंडी

पोलिसांनी दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरातून पळ काढल्यानंतर पोलीस खात्याची बदनामी झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मागे न हटता आंदोलकांच्यासमोर दोन हात करण्याची तयारी पोलिसांनी ठेवलेली आहे. त्याचाच भाग म्हणून काल गुरुवारी मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा वाळपई शहरामध्ये तैनात करण्यात आला आहे. तब्बल 100 पेक्षा जास्त पोलीस खात्याची वाहने वाळपई परिसरामध्ये दाखल झाली आहेत. यामुळे वाळपई – होंडा दरम्यानच्या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. सत्तरी तालुक्मयाच्या इतिहासामध्ये वाळपई शहरात पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे छावणीचे स्वरूप आलेले आहे.  एकप्रकारे पोलिसांची दहशत निर्माण झालेली आहे.

विश्वेश परोबला अटक, इतरांवरही होणार कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पोलिसांवर दगडफेक करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 100 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस खात्याच्या वरि÷ अधिकाऱयाकडून प्राप्त झालेली आहे. सामाजिक कार्यकर्ते विश्वेश प्रभू यांना बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले असून इतरांना येणाऱया काळात लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

मुंडवेल वाडे वास्कोत पुन्हा दरड कोसळली, मात्र हानी टळली

Patil_p

सरकारकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी, सर्वोच्च न्यायालयात जनतेचाच विजय होणार- संकल्प आमोणकर

Amit Kulkarni

जीएसटीपोटी 750 कोटी परताव्याची केंद्राकडे मागणी

Omkar B

सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणाऱयांवर कारवाई करा : मुख्यमंत्री

Patil_p

मुलांमधील गुणकौशल्यांना वाव देणारे शिक्षण हवे

Patil_p

फरारी मुख्य आरोपी व्हॅली डिकॉश्ताच्या मागावर पोलीस

Amit Kulkarni
error: Content is protected !!