तरुण भारत

चौपाटीवरच्या हॉकर्सचा प्रश्न आज सुटणार

प्रतिनिधी/ सातारा

सातारा विकास आघाडीच्या मोजक्याच्या शिलेदारांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजेंनी गुरुवारी जलमंदिर पॅलेस येथे बैठक बोलवली होती. ही बैठक बराच काळ सुरु होती. त्यात दि. 11 रोजी होणाऱया विषय समितीच्या सभापतीपदासाठी कोणाला संधी द्यायची हेही ठरले. मात्र, नावे आताच एक्सपोज करण्यात आली नाहीत, अशी खात्रीपूर्वक माहिती आहे. दरम्यान, गांधी मैदानावरील हलवलेल्या तेली खड्डय़ातील चौपाटीवरील तिढा सोडवण्यासाठी उद्या 1 वाजता तेली खड्डा येथे हॉकर्स धारकांच्यासमवेत बैठक होणार आहे. तत्पूर्वी खासदार उदयनराज्sा हे सकाळी 9.30 वाजता ग्रेड सेपरेटरचे कामाची पाहणी करणार आहेत. दुपारी कास तलावाच्या कामाची पाहणी करायला जाणार आहेत.

Advertisements

सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून गांधी मैदानावरील हॉकर्सचा प्रश्न बिकट होत चालला आहे. तेथे दोन गट पडले आहेत. तर तेली खड्डा येथील नियोजित जागेवर जलमंदिर पॅलेस येथे ज्यांचे वजन आहे त्यांचीच नावे पुढे आल्याने वाद चांगलाच रंगत राहिला अन् तेली खड्डय़ातल्या चौपाटीचा वाद थांबत नव्हता. गुरुवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी मोजक्याच शिलेदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत या विषयावर चांगलीच चर्चा झाली. त्यामुळे खासदार उदयनराजे हे स्वतः एक <वाजता तेली खड्डा येथे जी नियोजित चौपाटी आहे. तेथे एक व्यक्ती एक टपरी अशी जागा देण्यात येणार आहे. हॉकर्स धारकांच्यासमवेत त्यांनी स्वतः बैठक घेतल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे.

दरम्यान, सातारा शहरात महत्वाचे प्रकल्प म्हणून ग्रेड सेपरेटरच्या कामाकडे पाहिले जाते. हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. कामाच्या काही स्टेट्सची पाहणी करण्यासाठी सकाळी 9.30 वाजता पाहणी करणार आहेत. तेथून रविवार पेठ पोलीस चौकी ते गीते बिल्डिंग चौक या दरम्यानच्या खडीकरण, डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करुन दुपारी कास धरणाच्या कामाची पाहणी करायला जाणार आहेत, असेही समजते. तसेच नव्याने होणाऱया पालिकेच्या विषय समितीच्या सभापती निवडीमध्ये कोणाला संधी द्यायची आणि कोणाला थांबवायचे यावरही शिक्कामोर्तब झाले असून त्याची नावे गोपनिय ठेवली आहेत.

Related Stories

धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा

Rohan_P

५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ३०५ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

Abhijeet Shinde

सातारा : तब्बल सात वर्षांनी सज्जनला मिळाले त्याचे कुटूंब

Abhijeet Shinde

रत्नागिरी : दापोली येथे बिबट्याला जीवदान

Abhijeet Shinde

सिटी पोलीस लाईनमध्ये स्वच्छता अभियान राबवा

Abhijeet Shinde

सांगली कारागृहात ६२ कैद्यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!