तरुण भारत

थिबा पाँईटकडे वाहन नेताय तर ५०० रु. दंड

आकाशवाणी केंद्राशेजारीच पाँईटकडे जाणार मार्ग बॅरिकेटस् ने अडवला
वाहनांची होणारी गर्दी रोखण्यासाठी कार्यवाही

प्रतिनिधी/रत्नागिरी

Advertisements

रत्नागिरी शहरातील पर्यटकांसाठी महत्वाचे ठिकाण असलेला थिबा पाँईटकडे जाताय तर वाहने काही अंतर लांब पार्कींग करण्यावर सक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी या पाँईटकडे जाणारा रस्ता बॅरिकेटस्ने अडवून वाहन नेल्याचे उल्लंघन करणाऱयांना 500 रु. दंड आकारण्याचा फलक लावण्यात आला आहे.

थिबा पाँईट हे रत्नागिरीतील महत्वाचे पेक्षणीय स्थळ आहे. सायंकाळी तर येथून निसर्गाचे विलोभनीय दृष्य अनुभवता येते. त्यामुळे याठिकाणी स्थानिक तसेच परठिकाणहून आलेल्या पर्यटकांची मोठी गर्दी असते. पूर्वी याठिकाणी पाँईटच्या द्वारापर्यंत वाहने नेण्याची परवानगी दिली जात होती. मात्र कोविड काळात आकाशवाणी केंद्राच्या बाजूने जाणाऱया मार्गावर होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेत हा मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

त्या मार्गाच्या आकाशवाणी केंद्राशेजारील तोंडापाशीच बॅरिकेटस् लावून रस्ता अडवण्यात आला आहे. हे बॅरिकेटस् ओलांडून वाहने या मार्गावर नेल्यास त्याला 500 रु. दंड आकारण्याची सक्त ताकीद फलकाद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे या पाँईटकवर फिरण्यास जाणाऱया नागरिक व पर्यटकांना बॅरिकेटस् बाहेर आपली वाहने पार्कींग करून चालत जावे लागत आहे. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने हा मार्ग नगर परिषद व शहर वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

रत्नागिरीतील नीरा साखर वाढवतेय

Patil_p

खेर्डीतील ‘स्वामी समर्थ’ मार्केटिंग कंपनीच्या संचालकाला अटक

Patil_p

भरधाव ट्रकची इर्टीगा कारला धडक

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत १०७ रुग्णांची भर

Shankar_P

चौपदरीकरणातील मातीचा भराव वाहून शेतात!

Patil_p

फेसबुक आणि व्हॉट्सअॅप मैत्री पडली अकरा लाखाला

Shankar_P
error: Content is protected !!