तरुण भारत

विट्यात सव्वापाच लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक

प्रतिनिधी / विटा

चारचाकी वाहनातून बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या दोघांना विटा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ५ लाख २७ हजार ४०० रूपयांचा गुटखा आणि ६ लाख रूपयांची चारचाकी असा एकूण ११ लाख २७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवार ८ जानेवारी रोजी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली. या प्रकरणी प्रमोद उर्फ रोहित महादेव तहसिलदार (२०, रा . सदलगा, ता. चिक्कोडी, जि. बेळगांव, सध्या रा. माधवनगर, सांगली) आणि तानाजी वसंत शिंदे (४१, रा. तळेवाडी-करगणी, ता. आटपाडी, सध्या रा. माधवनगर, सांगली) या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.

याबाबत पोलिस निरीक्षक शेळके यांनी दिलेली माहिती अशी, सांगलीहून विट्याकडे बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पहाटे चार वाजता विटा-सांगली रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅरिकेटींग लावून संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी सांगली रस्त्याने एक चारचाकी (एमएच १० बीए ११४४) भरघाव वेगाने येत असताना दिसून आली. बॅरिकेट आडवे लावून वाहन थांबविण्यात आले.

Advertisements

गाडीची तपासणी केली असता गाडीत पाच लाख २७ हजार ४०० रूपये किंमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला, व्ही १ सुगंधी तंबाखू, सॅफरन ब्लेंडेड विमल पान मसाला, आरएमडी पान मसाला गुटखा असे सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले. तंबाखूजन्य पदार्थ आणि चारचाकी वाहनासह दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, असेही पोलिस निरीक्षक शेळके यांनी सांगितले.

ही कारवाई पोलिस नाईक सुजीत देवराय, अमर सुर्यवंशी, नवनाथ देवकाते, अभिजित वाघमोडे, हवालदार पुंडलिक कुंभार, होमगार्ड रवींद्र पवार, गणेश कोळी यांच्या पथकाने केली.

Related Stories

दापोलीतील शिरशिंगे येथे परराज्यातील कामगाराचा निर्घृण खून

triratna

समडोळी येथे कोविड सेंटरमधून ९० वर्षांच्या आजीसह २० जण कोरोनामुक्त

triratna

सांगली जिल्ह्यातील ११३ कोटींचे रखडलेले प्रकल्प मार्गी

triratna

दोघा अट्टल आंतरराज्य घरफोडय़ांना अटक

Rohan_P

सांगली : कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या गावात निर्बंधांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे : पालकमंत्री

triratna

अथणी तालुक्यात 18 किलो गांजा जप्त

Rohan_P
error: Content is protected !!