तरुण भारत

माजी आ.डॉ. सुजित मिणचेकर यांच्या प्रयत्नातून १० लाखांचा निधी मंजूर

 वार्ताहर / हुपरी

सर्व बाजूने सदन असलेल्या रांगोळी गावच्या विकासासाठी स्थानिक नेते, सरपंच व सर्व सदस्यांनी स्थानिक पातळीवरील सर्व हेवेदावे विसरून एकजुटीने जास्तीत जास्त निधी आणून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन माजी आमदार डॉ सुजित मिनचेकर यांनी केले.
रांगोळी (ता. हातकणंगले) येथे शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या 2515 या योजनेअंतर्गत गावाच्या रस्त्यासाठी दहा लाख रुपायांचा निधी मंजूर झाला असून यासंदर्भात रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांनी  गावातील मुख्य रस्ते अत्यंत खराब झालेले पाहून सदरच्या रस्त्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते.त्याची वचनपूर्ती पूर्ण करण्याच्या  अनुषंगाने  आमदार मिणचेकर  यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या २५१५ योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर केला होता. झेंडा चौक ते ग्रामपंचायत कार्यालय व हनुमान मंदिर ते काटकर गल्ली या ठिकाणी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आज माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आला.  गावाच्या मुख्य रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर केलेबद्दल  सर्व गावाच्यावतीने आमदार मिणचेकर यांचा भव्य स्वरूपात स्वागत करून सत्कार करण्यात आला. 

रांगोळी गावाच्या झेंडा चौक या ठिकाणी माजी आमदार मिणचेकर यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या2515 योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून रस्त्याच्या उदघाटन प्रसंगी चालू असलेल्या कार्यक्रमात स्वागत करीत असताना नाव का घेतला नाही असे म्हणत अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीमध्ये शाब्दिक वादावादी होऊन अंगावर धावून जाऊन हमरीतुमरी झाल्याची घटना घडली.लोकप्रतिनिधीच्या अंतर्गत वादामुळे  रांगोळी गावाचा विकास रखडला असून 20 वर्षे गाव पाठीमागे गेल्याची चर्चा नागरिकांतून सुरू होती.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : जनतेचे पांग फेडण्याची शक्ती गोमातेने द्यावी : मंत्री हसन मुश्रीफ

triratna

कोल्हापूरच्या जनतेचे कर्तृत्व,दातृत्व राज्यात भारी – डॉ. प्रशांत अमृतकर

triratna

‘एफआरपी’ च्या तुकडय़ांसाठी ‘करारपत्र’

triratna

कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर

triratna

कोल्हापूर : शहीद जवान संग्राम पाटील अनंतात विलीन

triratna

कोल्हापूर : वीज बिलाचे हफ्ते सवलत म्हणजे जनतेची चेष्टा

triratna
error: Content is protected !!