तरुण भारत

नगरविकासमंत्र्यांच्या हस्ते मनपाच्या कचरावाहू वाहनांचा शुभारंभ

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरात घरोघरी जावून कचऱयाची उचल करण्यात येते, याकरिता महापालिकेने 35 ऍटो टिप्पर खरेदी केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कचरावाहू वाहन ताफ्यात ऍटो टिप्पराची भर पडली आहे. या वाहनांचा शुभारंभ नगरविकासमंत्री बसवराज बी. ए. यांच्या हस्ते हिरवा ध्वजा दाखवून करण्यात आला. तसेच वाहनांचा वापर योग्य प्रकारे करून शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन नगरविकासमंत्र्यांनी केले.

Advertisements

शुक्रवारी महापालिका कार्यालयात नगरविकासमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली होती. याप्रसंगी वाहनांच्या विनियोगाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी नगरविकासमंत्र्यांनी महापालिका कार्यालय आवारात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला अभिवादन केले. तसेच याठिकाणी उभारण्यात येणाऱया प्रशासकिय इमारतीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर कचरावाहू वाहनांचे पूजन करून वाहनांच्या वापरास हिरवा ध्वज दाखविला. शहर स्वच्छतेसाठी राज्य व केंद्रशासनाकडून विविध सुविधा व उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचा उपयोग करून शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन नगरविकासमंत्र्यांनी केले. वाहनांच्या वापराची माहिती घेवून कचरा व्यवस्थापन नियोजनाचा आढावा घेतला. शहरात घरोघरी जाणून कचऱयाची उचल करण्यात येते. मोठय़ा आकाराची वाहने शहरात फिरविणे अडचणींचे ठरते. त्यामुळे लहान आकाराची वाहने महापालिकेने खरेदी केली असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर नगरविकासमंत्र्यांनी महापालिका सभागृहात आढावा बैठक घेतली.

यावेळी आमदार अनिल बेनके, बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, केयुआयडीएफसीचे श्रीनिवास, केयुआयडीएफसी महामंडळाच्या संचालिका दीपा कुडची, महापालिका आयुक्त जगदीश के. एच., स्मार्ट सिटी, बुडा, महापालिका, पाणीपुरवठा मंडळ आदी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. 

Related Stories

खानापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करावा

Patil_p

आता संपूर्ण शहरात सर्वेक्षण मोहीम

Patil_p

नार्वेकर गल्लीत दूषित पाण्याचा पुरवठा

Amit Kulkarni

समाजसेवा पुरस्काराबद्दल बाबुराव मुरकुटेंचा सत्कार

Amit Kulkarni

इस्कॉन जगन्नाथ रथयात्रा आजपासून

Patil_p

पतंग उडविण्यापेक्षा फोटोशूटसाठी क्रेझ वाढली

Amit Kulkarni
error: Content is protected !!