तरुण भारत

दोन लाखांच्या लाचप्रकरणी पोलीस नाईकासह दोघांना अटक

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

जुगाराच्या गुन्हयात आरोपी न करण्यासाठी दोन लाख रूपयांची लाच घेणारा सदर बाझार पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गणपतसिंग महोनसिंग चव्हाण (वय ३८) याला त्याचा साथीदार धीरजकुमार पांडुरंग शिवशरण (वय ३४) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या मित्रावर जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी गणपतसिंह चव्हाण याने दोन लाख रुपयांची लाच मागितली. त्याचा साथीदार शिवशरण याच्या मार्फत दोन लाख रुपये लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी आरोपींना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपाधिक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, रशीद बाणेवाले, श्रीराम घुगे, सनी वाघमारे यांनी केली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत आरोपी चव्हाण यांच्या घराची झडती घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Advertisements

Related Stories

सांगली : माडग्याळ जवळ अपघात,दुचाकीस्वार जागीच ठार

Abhijeet Shinde

अखेर मार्डी मंदिर समितीला जाग; सीसीटीव्ही सुरु

Abhijeet Shinde

‘रेमडेसिवीर’च्या घोळामुळे पालकमंत्री भरणे संतापले

Abhijeet Shinde

सोलापूर : लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांची उद्या टंकलेखन परीक्षा

Abhijeet Shinde

सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

Abhijeet Shinde

सोलापूर : दर निश्चितीच्या विरोधात डॉक्टरांकडून ‘मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन’च्या प्रतिकृतींची होळी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!