तरुण भारत

ब्राझीलमध्ये बळींची संख्या 2 लाखांवर

अमेरिका आणि भारत या देशांच्या पाठोपाठ कोरोना रूग्णसंख्येत जगात तिसऱया क्रमांकावर असणाऱया ब्राझील या देशात आता या रोगाने मृत पावलेल्यांची संख्या 2 लाखांहून अधिक झाली आहे. मृतांच्या संख्येचा दोन लाखाचा आकडा पार करणारा ब्राझील हा जगातील दुसरा देश ठरला. अमेरिकेने ही संख्या यापूर्वीची पार केली आहे. गेल्या दोन आठवडय़ांमध्ये या देशात निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा रूग्णसंख्या आणि मृतांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

निर्बंध शिथील केल्याबरोबर लोकांनी मौजमजा करण्यासाठी सागरतटांवर प्रचंड गर्दी केली. अनेक सागरतटांवर अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी माणसे जमली होती, असे वर्णन काही पत्रकारांनी केले. इतके दिवस बंधनांमध्ये राहिलेल्या लोकांनी निर्बंध शिथील झाल्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य उपभोगण्याचा अतिरेक केला. आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत, असे तज्ञांचे मत आहे.

Advertisements

प्रतिदिन संख्याही वाढली

या देशात प्रतिदिन रूग्णसंख्याही वाढली आहे. शुक्रवारी दिवसभरात 1 हजार 524 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकंदर मृत्यूसंख्या 2 लाख 498 पर्यंत पोहचली. प्रतिदिन नव्या रूग्णसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. 

300 च्या ठिकाणी 30 हजार

निर्बंध शिथील करताना ब्राझील सरकारने एका जागी 300 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली होती. मात्र ती धाब्यावर बसवून काही ठिकाणांवर 30 हजारांहून अधिक लोकांची गर्दी झाली. परिणामी, नियमांचा फज्जा उडाला. हे प्रकरण आता कोणत्या थरापर्यंत जाणार याचे अनुमान काढणेही कठीण आहे, अशी भावना या देशातील आरोग्य तज्ञांच्या पत्रकारासंसमोर व्यक्त केली.

Related Stories

कंबोडियाने केली भारताकडे लसीची मागणी

datta jadhav

जपानमध्ये सोशल डिस्टेंसिंगसाठी अनोखा प्रयोग

Patil_p

फ्रान्स : माजी अध्यक्ष कोरोनामुळे निवर्तले

Patil_p

ISIS-K च्या निशाण्यावर पाकिस्तान

datta jadhav

इस्लामाबादमध्ये मुखपट्टा अनिवार्य

Patil_p

फेसबुकवर भडकले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

Amit Kulkarni
error: Content is protected !!