तरुण भारत

एलआयसीची बंद विमा पॉलिसी सुरु करण्याची संधी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) यांच्याकडून पुन्हा एकदा विमाधारकांना दिलासा मिळणार आहे. कारण कंपनीने बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा चालू करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये पॉलिसीधारक 7 जानेवारी ते 6 मार्चपर्यंत ग्राहक आपली बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरु करु शकणार आहेत. गेल्या काही महिन्यात कोरोनामुळे अनेकांनी पॉलिसीचे हप्ते भरलेले नाहीत किंवा अनेक अडचणीही झेलल्या आहेत. काहींची पॉलिसी बंदही झाली आहे. अशांना आता बंद पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार आहे.

Advertisements

एलआयसीकडून सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार पहिल्या न भरलेल्या प्रीमियमधून पाच वर्षाच्या कालावधीत बंद झालेल्या पॉलिसी सुरु करता येणार आहेत. यामध्ये देशभरातील आपल्या 1526 सॅटेलाईट कार्यालयांना पॉलिसी सुरु करण्याकरीता अधिकृत केले आहे. यामध्ये एजंटचीही मदत घेता येणार आहे.  

लेट फीवर सवलत

पॉलिसीधारकांना पॉलिसी सुरु करताना भरावी लागणाऱया लेट फीमध्ये 20 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. तर 1 ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या वर्षाच्या प्रीमियमच्या पॉलिसीना चालू करण्यासाठी लेट फीवर 25 टक्क्यांची सवलत मिळणार आहे.

Related Stories

सेन्सेक्सचा 248 अंकांच्या वाढीसह नवा विक्रम

Patil_p

ब्रुकफिल्डकडून 30 एकरची जागा खरेदी

Patil_p

‘कोका-कोला’ पुन्हा करणार कर्मचारी कपात ?

Patil_p

‘फोनपे’ची बाजारावर मजबूत पकड

Amit Kulkarni

बँक-आयटी कंपन्यांच्या विक्रीने सेन्सेक्सची घसरण

Patil_p

इंटरनेटच्या स्पीड वाढीसाठी जिओचे मेश राउटर

Patil_p
error: Content is protected !!