तरुण भारत

सातारा : कण्हेरखेडला पानिपत शौर्यदिन होणार साजरा

सातारा / प्रतिनिधी :

कण्हेरखेड (सातारा) येथे दि. 14 रोजी शौर्यदिन शासकीय नियम पाळून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महेश पाटील-बेनाडीकर यांनी दिली.

कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरिता कण्हेरखेड येथे ग्रामस्थ व शिवप्रेमी यांचे सोबत अंतिम नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना पार्श्वभूमीवर लोकांच्या आरोग्याची काळजी व प्राथमिकता देत यावर्षी हा कार्यक्रम शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करत साधेपणाने मर्यादित स्वरुपाचा आसणार आहे. या हा कार्यक्रम शिंदे सरकारच्या वाड्यात सकाळी 11 वा. सुरु होईल. छ.शिवाजी महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करुन, शिंदे घराण्यांच्या 16 खांबी शौर्य समाधी स्थळाला अभिवादन करुन कार्यक्रमाला सुरुवात होईल.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते जेष्ठ इतिहास संशोधक व लेखक सुवर्णा नाईक-निंबाळकर व प्रमुख पाहुणे इतिहास मंडळाचे सचिव सतीश कदम तर विशेष अतिथी जागतिक शस्त्रात्रे संग्रहक व अभ्यासक गिरीश जाधव उपस्थित असणार आहेत, यावेळी कण्हेरखेड गावचे सरपंच संजय शिंदे, क्षत्रिय जनसंसदचे महेश पाटील – बेनाडीकर, ग्वाल्हेर घरण्याचे प्रतिनिधी हर्षजितराजे शिंदे, जयदिप शिंदे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप पोळ आदी उपस्थित होते.

Related Stories

सोनगाव कचरा डेपोनजीक उसाचा ट्रॅक्टर पलटी

Shankar_P

सातारा : गुळुंबच्या दोन युवकांची वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या

triratna

‘महाराणी ताराराणी, येसूबाईंच्या समाधी जीर्णोद्धारासाठी सहकार्य करणार’

triratna

ग्रेड सेपरेटर तात्काळ सुरु न केल्यास आंदोलन

triratna

सातारा : ग्रामीण रुग्णालयातील सुविधासाठी गायत्रीदेवी आक्रमक

triratna

सातारा : कार्वे नाक्यावर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणार

datta jadhav
error: Content is protected !!