तरुण भारत

सेन्सेक्स 689 अंकांच्या उसळीसह उच्चांकावर

निफ्टीचाही नवा विक्रम : इन्फोसिस, टीसीएस मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराने जवळपास 700 अंकांकडे झेपावत नवीन टप्पा गाठला आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे इन्फोसिस, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांचा जोरदार लिलाव झाल्यामुळे सेन्सेक्सने मजबूत स्थिती प्राप्त केली आहे.

दिग्गज कंपन्यांच्या जोरावर भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सने दिवसअखेर 689 अंकांची उसळी प्राप्त केली असून निर्देशांक 48,782.51 वर बंद झाला आहे. दिवसभरातील व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 48,854.34 चा सर्वोच्च टप्पा प्राप्त केला होता. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टीने 209.90 अंकांची भक्कम स्थिती प्राप्त करत 14,347.25 चा नवीन विक्रम नोंदवत निर्देशांक स्थिरावला आहे. दिवसभराच्या कामगिरीत निफ्टीने 14,367.30 चा उच्चांक नोंदवला होता.

प्रमुख कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीचे समभाग सर्वाधिक सहा टक्क्यांनी वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड कॉर्प आणि एनटीपीसीचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. दुसरीकडे इंडसइंड बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक, आयटीसी आणि एचडीएफसीचे समभाग घसरले आहेत.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

जागतिक पातळीवर दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. याचा काही प्रमाणात का असेना प्रभाव भारतीय शेअर बाजारावर होतो आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच ट्रम्प समर्थकांनी संसदेत घुसून हल्ला घडवून आणला आहे. परंतु याचा फारसा प्रभाव न होता भारतीय शेअर बाजाराने नवा विक्रम प्राप्त केला आहे. 

अमेरिकन काँग्रेसने राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये बायडन यांच्या विजयावर शिक्का मोर्तब केले आहे. यामुळे आगामी काळात अधिकचे प्रोत्साहन पॅकेज मिळणार असल्याचे संकेत निर्माण झाले आहेत.

Related Stories

मोबाईल ग्राहक संख्येत मोठी घसरण

Patil_p

बाजारातील सप्ताहाचा प्रारंभ घसरणीसोबत

Patil_p

बीएमडब्ल्यूच्या कार्स महागणार

Patil_p

सलग पाचव्या महिन्यात सेवा क्षेत्रात घसरण

Patil_p

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे बाजारातील तेजीत घसरण

tarunbharat

जानेवारी 15 पर्यंत साखरेचे उत्पादन 142 लाख टन

Patil_p
error: Content is protected !!