तरुण भारत

भारतीय वंशाच्या दोघांचा व्हाईट हाऊस सिक्‍युरिटी कौन्सिलमध्ये समावेश

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय वंशाच्या दोन अधिकाऱ्यांचा व्हाईट हाऊस सिक्‍युरिटी कौन्सिलमध्ये समावेश केला आहे. 

सुमोना गुहा आणि तरुण छाबडा अशी भारतीय वंशाच्या या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. गुहा यांची दक्षिण आशियाच्या वरिष्ठ संचालकपदी तर छाबडा यांची औद्योगिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी वरिष्ठ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

गुहा सध्या अलब्राईट स्टोनब्रिज समुहात वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. यापूर्वी ते बायडेन-हॅरिस कॅम्पेनमध्ये दक्षिण आशिया परराष्ट्र नीतीचे कार्यकारी समूह सह-अध्यक्ष होते. तर छाबडा हे ओबामा-बायडेन यांच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत रणनीती विभागाचे संचालक आणि मानवाधिकार, राष्ट्रीय सुरक्षेच्या मसुद्याचे संचालक होते.

Related Stories

अमेरिकेत 34.80 लाख कोरोनाबाधित

datta jadhav

चीनला हवीत अधिक मुले

Patil_p

कुवेतमधील 8 लाख भारतीय संकटात

Patil_p

तैवानशी आर्थिक संबंध स्थापण्याची तयारी

Patil_p

प्रथम कोरोना लस आणण्याचा मान रशियाला

Patil_p

188 देशांमध्ये फैलाव 13671 बळी

tarunbharat
error: Content is protected !!