तरुण भारत

बनावट नोटा बनवणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

200 आणि दोन हजाराच्या बनावट नोटाचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला दीड महिन्यानंतर यश आले आहे. या टोळीला जेरबंद केले असून विजय बाळासाहेब कोळी (वय 33 रा. अमर चौक, रेठरे धरण, सध्या रा. दत्तनगर, कुपवाड), शरद बापू हेगडे (वय 34 रा.राम-रहिम कॉलनी, संजयनगर सांगली), तेजस उर्फ भावड्या सूर्यकांत गोरे (वय 23, रा. गावठाण, मुस्लीम दफनभूमीजवळ मोरोची ता. माळशिरस जि. सोलापूर) याना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 90 हजाराच्या नोटा आणि प्रिंटींग साहित्य असा 21 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार बैठकीत दिली.

दीड महिन्यापासून टोळीचा शोध सुरू

गेडाम यांना जिल्ह्यात दोन हजार रुपयांची बनावट नोटा वितरीत करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी या टोळीची पाळेमुळे खणून काढण्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला आदेश दिले होते. शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी एका टीमच्या मदतीने शोध सुरु केला. या पथकाला अनेक ठिकाणी बनावट नोटा आढळून आल्या. पण या नोटा कोणामार्फत बाजारात येतात हे मात्र त्यांना कळत येत नव्हते. शुक्रवारी संध्याकाळी त्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय कोळी याचा या बनावट नोटाशी संपर्क असल्याची माहिती मिळाली. या पथकाने कोळीच्या कुपवाड येथील घरावर छापा टाकला. घरात बनावट नोटा आढळून आल्या आणि दीड महिन्यांनी या टोळीचा पदार्फाश झाला.

आंतरराज्य टोळी

कोळीचा मित्र शरद हेगडे त्याला नोटा बाजारात आणण्यासाठी देत होता. त्यातून कोळी याला पैसे मिळत होते. कोळीने चौकशीत हेगडेचे नाव सांगितल्यावर पोलिसांनी त्यालाही अटक केली. हेगडेकडे चौकशी केली असता त्याचा नातेवाईक तेजस उर्फ भावड्या गोरे हा बनावट नोटा तयार करून देत समजले. त्यानुसार गोरेला मोरोची (ता. माळशिरस) येथून अटक करण्यात आली आहे. ही टोळी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीने पाच-सहा महिन्यापासून पाच ते सहा लाख रूपये बाजारात आणल्याचेही निष्पन्न झाले आहे.

वारीत नोटा खपविल्या

200 आणि दोन हजाराच्या बनावट नोटा वारीत खपविल्याचे त्यानी चौकशीत पोलिसांना सांगितले आहे. 200 ची बनावट नोट ही हुबेहुब आहे. तर दोन हजाराची नोट मात्र बनावट असल्याचे तत्काळ समजून येते. दोन्ही नोटावर वॉटरमार्कही अत्यंत व्यवस्थित केला असल्याने नागरिक फसतात. या बनावट नोटा तयार करणारा संगणक, स्कॅनर आणि प्रिटींग मशिन पोलिसांनी जप्त केले आहे.

संशयितांनी सोने विकत घेतले

बनावट नोटा देऊन संशयितांनी सोने विकत घेतले आहे. हे सोने कोणाकडून घेतले, त्याला किती बनावट नोटा दिल्या आहेत. याचा तपास पोलीस करत आहेत. या कारवाईत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहायक निरीक्षक रविराज फडणीस, कुलदीप कदम, अभिजीत सावंत, अच्चुत सूर्यवंशी, सतीश आलदर, मच्छिंद्र बर्डे, उदय साळुंखे, जितेंद्र जाधव, राहुल जाधव, संदीप नलावडे, मुद्दसर पाथरवट, सुधीर गोरे यांनी कामगिरी केली.

25 हजारात एक लाख रुपये

बनावट नोटा बाजारात आणण्यासाठी या तिघांनी लाख रुपयांच्या बनावट नोटा फक्त 25 हजारात अनेकांना दिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी कितीजणांना किती नोटा दिल्या आहेत, याची माहिती पोलीस काढत आहेत. जवळपास पाच ते सहा लाखाच्या नोटा बाजारात आल्या असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Related Stories

कोयने पाठोपाठ वारणेचा विसर्ग कमी; कृष्णा सुरक्षित पाणी पातळीवर

Abhijeet Shinde

माधवनगर, बुधगाव, कवलापूरची नगरपालिकेच्या दिशेने वाटचाल

Abhijeet Shinde

चुये येथे युवतीची आत्महत्या

Abhijeet Shinde

मिरजेतील भाजी मंडईसाठी आता नव्या जागेचा पर्याय

Abhijeet Shinde

माशाच्या जाळीतून मगरीच्या पिल्लाची ॲनिमल राहतने केली सुटका

Abhijeet Shinde

मिरजेत गांजा तस्करी करणाऱ्या पुणे येथील तरुणासह दोघांना अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!