तरुण भारत

सोलापूर : कंदर येथे विजेच्या धक्क्याने विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा

करमाळा तालुक्यातील कंदर येथे आज इलेक्ट्रिक डीपीवर काम करत असताना विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. सचिन सदाशिव साळुंखे (वय 31) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. सचिन साळुंखे हा कंदर सब स्टेशनला कॉन्ट्रॅक्ट बेस वर कामाला होता.

कंदर बिटरगाव या लाईनवरील विद्युत ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यासाठी सचिन सांळुंखे गेला होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास परमिट घेऊन तो ट्रान्सफर दुरुस्तीसाठी शेतात गेला. लाईट नसल्याची खात्री करून त्याने कामास सुरुवात केली. मात्र, अचानक लाईट सुरु झाली व मेन लाईन चा शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ऑपरेटर, ज्युनियर अभियंता  या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी उपस्थित नागरिकांनी केली आहे.

Advertisements

यावेळी उपअभियंता गव्हाणे यांनी याबाबतची फिर्याद करमाळा पोलीस ठाण्यात दिली असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

उस्मानाबाद : सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदारांना आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांच्या ऊस व शेअर्सचे पैसे द्या अन्यथा आंदोलन करू; शिवसैनिकांचा इशारा

Abhijeet Shinde

पंढरपूर कार्तिकीचा जनावर बाजार रद्द

Abhijeet Shinde

सोलापूर : वळसंगच्या महिला सरपंच त्यांचे पती आणि ग्रामसेवकांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

नक्षलवाद्यांशी लढताना पंढरपूरचे पोलीस उपनिरीक्षक गडचिरोलीत शहीद

Abhijeet Shinde

सोलापूर : रोजंदार गट क्र.१ च्या कर्मचारी सेवा स्थगितीला विरोध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!